Headlines

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ


मालवण प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६चा उद्घाटन समारंभ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.

मालवण तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील पहिले पुष्प ‘विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध’ या विषयावर तालुका उपाध्यक्ष, माजी श्रामणेर तथा बौद्धाचार्य नचिकेत पवार यांनी गुंफले. यावेळी बोलताना नचिकेत पवार म्हणाले की, तथागत भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांनी प्रतिपादन केलेला प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत आणि अनित्य सिद्धांत यांची प्रचिती आजही जगभर अनुभवास येते. प्रज्ञा, समता, करुणा आणि शील या नीतिमूल्यांना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याची शिकवण भगवान बुद्धांनी दिली आहे. त्यामुळे भगवान बुद्ध हे संपूर्ण जगाचे विश्वगुरू असल्याचे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत स्पष्ट केले.

यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, संरक्षण कमांडर अरुण जाधव, जिल्हा महिला शाखा संस्कार उपाध्यक्षा स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला शाखा संघटक लीना तळगावकर, तालुका महिला शाखा सरचिटणीस समता डिकवलकर, संस्कार सचिव मिलिंद पवार, तालुका संघटक भरत पेंडूरकर, तालुका प्रचार व पर्यटन सचिव सचिन कासले, बार्टीचे समतादूत संग्राम कासले, तालुका महिला शाखा संघटक सानिका कदम, कुणकवळे गाव शाखाध्यक्ष संदीप कदम, मसदे गाव शाखाध्यक्ष तानाजी कदम, वडाचा पाट गाव शाखाध्यक्ष गणेश कासले, वराड गाव शाखाध्यक्ष राजेंद्र वराडकर, गोळवण गाव शाखाध्यक्ष शशिकांत पवार, तळगाव गाव शाखाध्यक्ष संदीप तळगावकर, चौके गाव शाखाध्यक्ष रामचंद्र कदम, डिकवल गाव शाखेचे सचिव सदानंद डिकवलकर, वराड गाव शाखा कोषाध्यक्ष अरविंद वराडकर, चौके गाव शाखा कोषाध्यक्ष शुभम चौकेकर, वैभव पवार, कुणकवळे गाव शाखा महिला अध्यक्षा निशाताई कदम, संघमित्रा कदम, कुमार सुयश कदम तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संस्कार विभागाचे सचिव योगेश वराडकर यांनी केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत