Headlines

रेकॉर्डब्रेक पावसाचे राज्यात थैमान – Tarun Bharat


कोकण, मध्य महाराष्ट्र ठप्प : मुंबई-पुणेदरम्यानची रस्ते वाहतूक कोलमडली : रेल्वे-विमानसेवेतही व्यत्यय

सक्रिय मोसमी वाऱ्यांनी कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत धुडगूस घातला असून, राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मावळ, मुळशी, कोकणपट्ट्यात दरडी कोसळल्याने रस्ते तसेच रेल्वेसेवा ठप्प झाली असून, मुसळधार पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. महामार्गांवर दरडी कोसळण्याच्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे मुंबई-पुणे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. राज्यात नद्यांना पूर आल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.  दरम्यान, गेल्या 24 तासांत घाट भागात पावसाची विक्रमी नोंद झाली असतानाच पुढील दोन दिवस पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

त. भा. प्रतिनिधी

पुणे, मुंबई :  राज्यात मोसमी वारे गेल्या सात ते आठ दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. गुजरात ते केरळ किनारपट्टीदरम्यान हवेचा दबाव गेले चार दिवस कायम आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, दक्षिण झारखंड तसेच ओरिसाच्या भागावर ते आहे. हे क्षेत्र पुढे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकणार आहे. याशिवाय राजस्थान ते ओडिशावरील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा दाबदेखील कायम आहे. वरील सर्व हवामानातील घडामोडींमुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून जोमाने सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अरबी समुद्रातून मोठया प्रमाणात ढग येत असल्याने कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या भागात अक्षरश: थैमान घातले असून, त्यात रविवार तसेच सोमवारच्या पावसाने भर घातली.  रविववारपासून या भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. यामुळे मुंबईसह, रायगड, पालघर, लोणावळा, मावळ, मुळशी, पुणे, या भागात दरडी कोसळल्या असून, काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीने पूररेषा पार केली आहे. तर खेड, चाकण भागातदेखील अनेक घरात पाणी शिरले. पावसामुळे पुणे नाशिक मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.

पुणे शहर व परिसरात पावसाचा मारा

पुणे शहर आणि परिसरात पावसाचा मारा दुसऱ्या दिवशी सोमवारीदेखील कायम होता. पावसाने थोडीशीदेखील उसंत घेतली नाही. पुण्यात सोमवारी सकाळपर्यंत 108.4 मिमी इतका पाऊस झाला, चिंचवडमध्ये 206.5, पाषाण 113, भोरमध्ये 172 मिमी, माळीण 83, दापोडी 93, डुडुळगाव 110, राजगुऊनगर 95,  पाऊस नोंदविण्यात आला. सततच्या पावसामुळे प्रमुख रस्त्यावर पाणी साठले असून, नागरिकांना साठलेल्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शाळांना सुट्टी दिल्याने रस्त्यावर गर्दी कमी असली, तरी वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे. जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने अनेक तलाव, सांडवे, ओढे, नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणांत वेगाने वाढ होत असल्याने येथून कधीही विसर्ग सुरू केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुडगूस घातला असून, यामुळे सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. ऊळांवर पाणी साठल्याने लोकल रेल्वेसेवा बाधित झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे काही विमाने रद्द, तर काही विमाने उशिरा उ•ाण करीत आहेत. रस्त्यात जागोजागी पाणी साठल्याने वाहतूक सेवादेखील विस्कळीत झाली आहे.

दोन दिवस पावसाची तीव्रता अधिक

नाशिक, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यांत रेड अलर्ट  राज्यात पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार असून, मंगळवारी पालघर, नाशिक, रायगड, पुणे जिल्ह्यांत अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर बुधवारी केवळ पुणे घाट परिसरात रेड अलर्ट असून, यानंतर हळूहळू पावसाचा मारा कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.  कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात बुधवारीदेखील पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. यात पुणे घाट भागात रेड अलर्ट असून, रायगड आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारनंतर हळूहळू राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे.

हवामान विभागाकडून माहिती जारी

किनारपट्टीवरील हवेचा दाब तसेच झारखंड व ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत बोलताना पुणे हवामान विभागाचे हवामानतज्ञ एस. डी. सानप म्हणाले, सध्या राज्यभरात मान्सून सक्रिय झालेला असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ते पश्चिमेकडे सरकले आहे. यामुळे मान्सूनचे वारे प्रभावशाली होऊन त्याचे बाष्प अधिक प्रमाणात घेऊन वाहण्याची वहनक्षमता वाढलेली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर संबंधित मान्सूनचे वारे धडकून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. लोणावळा, ताम्हिणी याठिकाणी याचमुळे अधिक पाऊस दिसून येत आहे. संबंधित वारे पुढे वाहत असताना त्यातील बाष्प कमी होत असल्याने मराठवाडा, विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी दिसून येत आहे.

मध्य, पूर्व भारतात पाऊस

गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, बिहार, गोवा, कर्नाटक, आसाम, मेघालय राज्यांत पुढील दोन दिवस अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात गुजरात, कर्नाटक किनारपट्टी, सिक्कीम, गोवा येथे मंगळवारी 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा, तर राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. गुऊवारनंतर देशातील पावसाची घट होण्याची शक्यता आहे.

अतिवफष्टीचा पालघर जिह्याला तडाखा बसला असून गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे गाड्यात अडकलेल्या प्रवाशांना रस्तेमार्गांनी सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगडमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पण शहरांत पाणी शिरलेले नाही. चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा घाटाच्या भागात अतिवफष्टी झाली आहे. कोल्हापूरमध्येही पाण्याची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे चालली आहे. तिथे पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई-पुणे महामार्गावर 100 टनांचा ढिगारा

मुंबई-पुणे  महामार्गावर दरड कोसळल्याने 100 टन ढिगारा जमा झाला होता. आतापर्यंत 70 टन ढिगारा काढून टाकण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वत: तिथे जाऊन लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे ढिगारा कधीच जमा झाला नव्हता. ढिगाऱ्यात अडकलेल्या चारचाकी वाहनांना काढण्याचे काम सुरू आहे. रेल्वेनेही वेगाने कारवाई सुरू करून सेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस म्हणाले.

वारकऱ्यांनी पुण्यातच जमावे

सध्या वारी सुरू असून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरचे चारही पूल पाण्याखाली चालले आहेत. 10 तारखेला पुण्यात वारी येणार आहे. पण या स्थितीमुळे वारकऱ्यांनी देहू-आळंदीला जमा न होता पुण्यात यावे, असे आवाहन करत वारीसाठी जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात पुढील 48 तास अतिवफष्टीचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात येत्या 8 जुलैपर्यंत विविध भागात अतिवफष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारचा अलर्ट हा नाशिकसाठी आहे. तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मधल्या भागात ढगफुटीमुळे 300 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत महिन्याभराच्या सरासरीचा पाऊस केवळ चार दिवसांत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. राज्यात सुरू असलेल्या अतिवफष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत