Bandhu Marathi Movie: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं एका सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. यावर ‘राम आहे म्हटल्यावर लक्ष्मण तर येणारच’ अशी टॅग लाइनही होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे पाहायला मिळत आहे. तर कौटुंबिक सिनेमांची संख्याही वाढताना दिसतेय. आई-लेक, सासू-सून, बाप-लेक अशा नात्यांवर अनेक सिनेमे गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता आणखी एका सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात दोन भावांची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहे. या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. ‘बंधू’ असं या आगामी सिनेमाचं नाव आहे.
जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये प्रथमच एकत्र मध्यवर्ती भूमिकेत
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदारअभिनेते जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये आता ‘बंधू’ या आगामी चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. दोन भावांमधील अतूट प्रेम, नात्यांतील संघर्ष आणि काळाच्या ओघात नात्यांची लागणारी कसोटी यांची भावनिक कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘राम आहे म्हटल्यावर लक्ष्मण तर येणारच’ या टॅगलाइनमधूनच चित्रपटातील बंधूभावाचं महत्त्व अधोरेखित होतं. सिनेमाचं पोस्टरही सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे.
चित्रपटात मृण्मयी देशपांडे , मिताली जगताप,स्मिता तांबे यांच्याही भूमिका
नात्यांमधील प्रेम, त्याग आणि भावनिक गुंतागुंत यांचा वेध घेणारी ही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. बंधू चित्रपटात मृण्मयी देशपांडे, मिताली जगताप आणि स्मिता तांबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
विशेष म्हणजे हिंदी चित्रपट अभिनेता रजत बेदी ‘बंधू’ या सिनेमानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करत आहे.
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन सुपेकर यानं केलं असून प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप ओझा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. विजय गवंडे यांचं संगीत लाभलेल्या या चित्रपटातून नात्यांची भावनिक ताकद आणि भावांमधील निस्सीम प्रेम मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा