Headlines

रस्त्यावर खड्डा दिसताच 4 सेकंदात कंत्राटदाराची पालिकेकडे तक्रार जाणार; बंगळुरूच्या इंजिनिअरची ‘AI’ कमाल। Maharashtra Times


खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप आता भूतकाळ ठरणार आहे. बंगळुरूच्या एका तरुण इंजिनिअरने आपल्या कौशल्याचा वापर करून एक युनिक ‘Anti-Pothole AI’ सिस्टीम तयार केली आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान रस्त्यावरील खड्डे ओळखण्यासोबतच, त्या रस्त्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदाराची संपूर्ण माहिती अवघ्या 4 सेकंदात शोधून काढते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Anti pothole AI system । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार कुठे करायची, या चिंतेवर एका इंजिनिअरने ‘टेक-तोडगा’ शोधला आहे. हे नवीन एआय सिस्टीम खराब रस्त्यांचे स्कॅनिंग करून थेट संबंधित ठेकेदाराचा डेटाबेस उघड करते आणि फक्त 4 सेकंदात दुरुस्तीचा रिपोर्ट तयार करते. यामुळे प्रशासनाला निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर त्वरित कारवाई करणे सोपे होणार आहे.

खराब रस्ते आणि त्यावरील जीवघेणे खड्डे हा भारतातील बहुतांश शहरांमधील वाहनचालकांसाठी अत्यंत गंभीर आणि डोकेदुखीचा विषय बनला आहे. दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपले प्राण गमावतात. सामान्य नागरिक अनेकदा या समस्येमुळे त्रस्त होतात, परंतु कंत्राटदार आणि पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे तक्रार नेमकी कुठे करायची, या विचारात शांत बसतात. हीच अडचण ओळखून बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून एक खास ‘Anti-Pothole AI’ सिस्टीम (अँटी-पॉथहोल कृत्रिम बुद्धिमत्ता सिस्टिम) विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान रस्त्यावरील खड्डे ओळखण्यासोबतच, त्या रस्त्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदाराची संपूर्ण माहिती शोधून अवघ्या 4 सेकंदांत डिजिटल रिपोर्ट तयार करते. (REF.)

‘इंटरव्ह्यूरेडी’ या टेक स्टार्टअपचे संस्थापक आणि इंजिनिअर गौरव सेन यांनी हे अनोखे मॉडेल तयार केले आहे. त्यांनी OpenAI च्या प्रसिद्ध Codex आणि AI Vision Models चा वापर करून हा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे.

‘Anti-Pothole AI’ सिस्टिम

या सिस्टिमचे कार्य पूर्णपणे डेटा सायन्स, सेन्सर्स आणि अत्याधुनिक अल्गोरिदमवर आधारित आहे. गौरव सेन यांनी त्यांच्या वाहनावर एक Dashcam, GPS ट्रॅकर आणि Accelerometer सेन्सर बसवला आहे. गाडी चालत असताना ही सिस्टीम पुढील तंत्रज्ञानाचा वापर करते.

रिअल-टाइम व्हिडिओ स्कॅनिंग: डॅशकॅमद्वारे समोरील रस्त्याचे सतत चित्रीकरण केले जाते. ‘एआय व्हिजन मॉडेल’ या फुटेजचे थेट विश्लेषण करून खड्ड्यांचा आकार (लहान, मध्यम आणि मोठा) अचूकपणे ओळखते.

अदृश्य खड्ड्यांची ओळख: अनेकदा अंतरावरून खड्डे हे केवळ ‘स्पीड ब्रेकर’सारखे वाटतात, जे उघड्या डोळ्यांना फसवू शकतात. मात्र, हे एआय मॉडेल चालत्या गाडीतून अशा छुप्या खड्ड्यांनाही त्वरित ट्रॅक करते.

कंत्राटदाराचा डेटाबेस मॅपिंग: हा या तंत्रज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे. गौरव सेन यांनी बेंगळुरू महानगरपालिकेच्या (BBMP) सुमारे 2,900 सरकारी रस्ते कंत्राटांचा डिजिटल डेटाबेस या ॲपला जोडला आहे.

फक्त 4 सेकंदांत तक्रार थेट पालिकेकडे

जेव्हा गाडी एखाद्या खड्ड्यावरून जाते, तेव्हा एआय सिस्टीम त्या जागेचे अचूक भौगोलिक अक्षांश-रेखांश (Geolocation) टिपते. त्यानंतर ती 2,900 करारांमधून संबंधित रस्ता कोणत्या कंत्राटदाराने बांधला आहे आणि तो रस्ता सध्या ‘वॉरंटी’ (Defect Liability Period) अंतर्गत येतो का, याचा शोध घेते. कायदेशीर नियमांनुसार, वॉरंटी कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्यास ते मोफत दुरुस्त करण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा