सावंतवाडी प्रतिनिधी : माजी मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रक्तदाता संघटना व नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संदिप सावंत, सावंतवाडी शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अँड. सायली दुभाषी, पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, शितल नाईक, गजानन नाटेकर, प्रशिक्षित मांजरेकर तसेच सर्व शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी उपचिल्ला रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मुख्य अधिकारी प्रशांत सातार्डेकर, तंत्रज्ञ प्राजक्ता रेडकर, परिचारीका मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे, प्राची राणे यांचा रक्तपेढीच्या अविरत सेवेबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर, बासीत पडवेकर, युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, वसंत सावंत, अँड प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ, मेहर पडते आदी उपस्थित होते.
