अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. एफडीएने मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर धाड टाकली. यावेळी अन्न सुरक्षा मानकांचे समाधानकारक पालन न झाल्याचे निदर्शनास आले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात गेल्या दोन दिवसांत एकूण 15 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली. या दोन दिवसांच्या कारवाईत अनेक आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आल्या आहेत. तसेच लाखो रुपयांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील प्रसिद्ध दादासाहेब फाळके चित्रनगरीतील कॅफे पासून ते पुणे, नाशिक, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये धडाकेबाजी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक अस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
फिल्म सिटीत कारवाईत काय आढळले?
दादासाहेब फाळके चित्रनगरी, फिल्म सिटी, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील बॉलीवुड कॅफे, स्टुडिओ नंबर १३, आरे कॉलनी (पूर्व), मुंबई ४०००६५ या आस्थापनेची अन्न सुरक्षा विभागामार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आस्थापनेमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे पालन समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या प्रमुख बाबी :
आस्थापनेतील भांड्यांची स्वच्छता तसेच परिसराची स्वच्छता समाधानकारक नसल्याचे आढळून आले.
परिसरामध्ये माश्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला.
स्वयंपाकघरामध्ये सांडपाणी, घाण व अन्नाचे अवशेष आढळून आले असून स्वच्छता व hygiene ची स्थिती अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले.
गंजलेल्या व अस्वच्छ food-contact surfaces वर अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे आढळून आले.
सदर त्रुटींच्या अनुषंगाने आस्थापनेस अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या निर्धारित मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून FSS Act, २००६ मधील कलम ६९ अंतर्गत दंडात्मक कारवाई घेण्यात येत आहे.
राज्यात काय-काय कारवाई करण्यात आली?
ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या zepto, blinkit, instamart इति. आस्थापनांवर दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत राज्यभरात एकूण ८६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १ आस्थापनेची व्यवसायिक कार्यवाही तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच 60 सुधारणा नोटीसा बजावण्यात आल्या. १४ आस्थापना blinkit चे ५, zepto चे ५, instamart चे २, bhagwati store चे १, swinsta ENT pvt. Limited चे १ यांचा अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई केली. एकूण ६९८ कि.ग्रॅम दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याची एकूण किंमत ३४,३०२ रुपये इतकी आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ९ आरोपींना अटक करून एकूण ४६,७६,६३१ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
इतर अन्नपदार्थाचा (दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, खादयतेल इत्यादि अन्नपदार्थ) सुमारे १,२९,७६२ रुपये किंमतीचा व १२७० किलो साठा जप्त करण्यात आला. एकूण १०९ हॉटेल/रेस्टॉरंट / धाबा इ. च्या तपासणी करून ४९ आस्थापनांना सुधारणा नोटीस देवून ०४ अन्न आस्थापनाचे परवाने निलंबन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा