Vidyavihar and Mankhurd Flyover: मुंबईतील पूर्व उपनगरांमधील कोंडी फोडण्यासाठी दोन महत्त्वाच्या पुलांचं काम सुरू आहे. यापैकी विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचं काम येत्या ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून दोन नव्या पुलांचं काम सुरू होतं. शहरात विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल आणि मानखुर्द महाराष्ट्र नगर पुलाचं काम वेगाने सुरू असून या दोन्ही प्रकल्पांसाठी डेडलाइन दिली आहे. अनेक काळापासून प्रलंबित पुलांचं काम पूर्ण झाल्यावर विद्याविहार आणि शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी फुटणार आहे.
पूर्व ते पश्चिम प्रवास सोपा होणार
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रक्लप) अभिजीत बांगर यांनी शनिवारी दोन्ही प्रकल्पांची पाहणी केली आणि त्यावेळी ही अपडेट दिली. तब्बल ३५ वर्षांची प्रतीक्षा संपणार असून, विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचं काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले आहेत. या पुलाचं तब्बल ८०% टक्के काम पूर्ण झालं आहे. विद्याविहारमध्ये पूर्व ते पश्चिम प्रवास करताना तब्बल ४० ते ४५ मिनिटं वेळ जातो. पण या पुलाचं काम पूर्ण होताच विद्याविहार पूर्व ते पश्चिम प्रवास १० ते १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे.
या उड्डाणपूल ६५० मीटर लांब असून पूर्वेतील लाल बहादूर शास्त्री मार्गाला (LBS Road) पश्चिमेतील रामकृष्ण चेंबूरकर मार्गाशी जोडणार आहे. थेट मध्य रेल्वेच्या रुळांवर हा पूल उभारला आहे. या पुलासाठी पहिला प्रस्ताव महापालिकेकडे १९९१ मध्ये मांडला होता. त्यानंतर २०१६ मध्ये प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली आणि मग बांधकाम सुरू झालं. पण त्यानंतरही अनेक अडथळ्यांमुळे प्रकल्पाच्या बांधकामाला विलंब झाला.
विद्याविहार पुलासाठी १७८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. १०० मीटर उंच स्टील गर्डरवर मार्ग बांधला आहे. या मार्गाच्या बांधकामादर्यान तब्बल २१३ झाडं बाधित होणार होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यापैकी ७७ झाडं तोडण्यात आली, ८५ झाडांचं पुनर्रोपन करण्यात आलं आणि ५१ झाडं जागेवरचं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी उड्डाणपुलापासून रेल्वे स्थानकांच्या पदपथापर्यंत मार्ग मिळणार आहे.
शीव-पनवेल महमार्गावर कोंडी फुटणार
विद्याविहार पुलासह मानखुर्द-महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाचंही काम वेगाने सुरू असून ऑगस्ट २०२७ पर्यंत हा पूल वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली. शीव-पनवेल महामार्गावर टी-जंक्शनवर सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. नवी मुंबई, पुणे आणि मुंबईतील वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सिग्नलवरील ट्रॅफिक जॅममध्ये प्रवाशांना १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबावं लागतं.
या प्रस्तावित पुलावर दोन मार्गिका असतील. हा मार्ग थेट घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला जोडणार आहे. शीव-पनवेल महामार्गावरील टी-जंक्शनपासून सुरू होऊन जीएमएलआरपर्यंत पोहोचेल. एक मार्गिका १.४७ किमी लांब आणि दुसरी मार्गिका १.९३ किमी लांब असेल. या मार्गासाठी १,९५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक मार्गिका दोन पदरी असेल. ६.५ ते ८.५ रुंदीचे हे मार्ग असतील. घाटकोपरच्या दिशेने नवी मुंबई, मुंबई आणि पुण्याला प्रवास करणाऱ्या वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा