Headlines

माजगाव येथील इलेक्ट्रिशन पर्सियस डायस या युवकाचे आकस्मित निधन


ओटवणे प्रतिनिधी : माजगाव ख्रिश्चनवाडी येथील इलेक्ट्रिशन पर्सियस सॅबेस्टीन डायस (३९) या युवकाचा मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. या युवकाच्या अकाली व आकस्मित निधनाने डायस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असून माजगाव गरड परिसरात शोककळा पसरली.
बुधवारी सायंकाळी पर्सियस डायस याच्या छातीत अचानक दुखत असल्यामुळे तो माजगाव नाला येथील एका डॉक्टरकडे गेला होता. मात्र याचवेळी हृदयविकाराच्या धक्क्याने तो खाली कोसळला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी त्याला कोलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. पर्सियस डायस हा कष्टाळू व मनमिळावू होता. चार वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तो सावंतवाडी शहरात व माजगाव भागात इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. त्याच्या आकस्मित निधनाचा त्याच्या मित्र परिवारालाही धक्काच बसला. आज बुधवारी संध्याकाळी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत