Devoleena Bhattacharjee post:टीव्हीवरील ‘गोपी बहू’ या पात्राने घराघरांत पोहोचलेली देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती आपले मत बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखली जाते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी तिच्या मालिकांपेक्षा आता सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यावर ती व्यक्त होताना दिसते. आता तिनं असं काही वक्तव्य केलंय, ज्याच्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
एका एक्स (ट्विटर) युजरच्या पोस्टवर उत्तर देताना देवोलीनानं “मंत्रोच्चार करून बघा, आरक्षणाची गरजच पडणार नाही” असा सल्ला दिल्यानं सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिच्या या कमेंटनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून, जातीयवादी, बेरोजगारी आणि लॉजिकवरून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
नक्की काय घडलं? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर एका युजरनं काही लहान मुलं वेद मंत्रोच्चार करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करत युजरनं प्रश्न उपस्थित केला होता की, अशा प्रकारच्या धार्मिक शिक्षणाचा देशाच्या प्रगतीत काही उपयोग आहे का?या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली की, अभ्यासाच्या वयात हे लोक मंत्रोच्चार करतील आणि नंतर नोकरी मिळाली नाही की आरक्षणाला दोष देतील.या कमेंटला उत्तर देताना ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीनानं लिहिलं की,मंत्रोच्चार करून बघा, आरक्षणाची गरजच पडणार नाही. स्वतः ज्ञानी व्हाल आणि दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल देवोलीनाचं हे वक्तव्य समोर येताच सोशल मीडियावर तिच्याविरोधात संतापाची लाट पसरली. अनेक युजर्सनी तिच्या या अजब तर्कावर प्रश्न उपस्थित करत तिला चांगलंच सुनावलं.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा