Headlines

भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! आशियाई क्रिकेट परिषदेने वेळापत्रक जाहीर केलं


मुंबई : महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ही अधिकृत घोषणा केली. २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान दुबईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, सर्वाधिक उत्सुकता भारत-पाकिस्तान सामन्याची आहे.

भारत आपल्या मोहिमेची सुरुवात ३० ऑगस्टला थायलंडविरुद्ध करणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरला हाँगकाँगशी सामना होईल. त्यानंतर ५ सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भारतीय संघ आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या हायव्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Maharashtra TimesIND vs SL Test Series : भारत-श्रीलंका वॉर्म-अप सामना फ्रीमध्ये पाहू शकता का? टॉस किती वाजता, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
दरम्यान असे असतानाच, यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १७ षटकांत १०६ धावांत गारद झाला होता. त्यामुळे आशिया चषकातील या सामन्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

महिला आशिया चषक २०२६ संपूर्ण वेळापत्रक

२८ ऑगस्ट : थायलंड विरुद्ध हाँगकाँग

२९ ऑगस्ट : श्रीलंका विरुद्ध यूएई

३० ऑगस्ट : भारत विरुद्ध थायलंड

३१ ऑगस्ट : बांगलादेश विरुद्ध इंडोनेशिया

१ सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध थायलंड

२ सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध इंडोनेशिया

३ सप्टेंबर : भारत विरुद्ध हाँगकाँग

४ सप्टेंबर : यूएई विरुद्ध इंडोनेशिया

५ सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान

६ सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

७ सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग

८ सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध यूएई

१० सप्टेंबर : पहिला उपांत्य सामना

११ सप्टेंबर : दुसरा उपांत्य सामना

१३ सप्टेंबर : अंतिम सामना

Maharashtra TimesWTC Final Scenario : पाकिस्तान जवळपास आऊट, पण भारत अजूनही WTCची फायनल गाठू शकतो, नेमकं कसं? वाचा संपूर्ण समीकरण

सामने किती वाजता सुरु होतील?

दरम्यान, स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहेत. दुबईत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यासह उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.