IND vs IRE Playing 11 News : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. या सामन्यामध्ये भारताने टॉस जिंकला असून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आजही वैभव सूर्यवंशी याची निवड झालेली नाही. पण टीममध्ये दोन मोठे बदल झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आहे. भारताने आज पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने दोन मोठे बदल केले आहेत. आजच्या सामन्यामध्ये दोन युवा खेळाडू पदार्पण करणार आहेत. भारताकडून आज प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर केले गेले आहे. तर प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे यांना अंतिम ११ मध्ये संधी दिली आहे. सर्वांना उत्सुकता होती की, आजचा सामना शेवटचा असल्यामुळे वैभव सूर्यवंशी याला संधी दिली जाईल. मात्र अजूनही वैभवला पदार्पणासाठी वाट पाहावी लागणार आहे.
आजच्या सामन्यामध्ये निवड झालेल्या प्रिन्स यादव याने अफगाणिस्तानविरूद्धच्या वनडे मालिकेमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला टी-२० क्रिकेटमध्ये खेळवण्याची संधी दिली आहे. नीतीश कुमार रेड्डी दुखापती झाल्याने त्याला संघात जागा मिळाली होती. वॉशिंग्टन सुंदर याच्या खराब कामगिरीमुळे त्याला आज वगळण्यात आले. तर ऑल राऊंडर म्हणून संघात खेळवलं आहे. दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा याला आयर्लंडने जबरी मार दिला. त्याचा स्पेल भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. त्यामुळे दोन मोठ्या खेळाडूंना बसवत दोन आयपीएल स्टार्सना आज संधी देण्यात आली आहे. IND W vs AUS W : भारताचा आज कठीण पेपर, बांगलादेशने आफ्रिकेचा गेम केला तर भारताची सेमी फायनलमध्ये एन्ट्री फिक्स, समीकरण जाणून घ्या आताच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाकडून सूर्यांश शेडगे याने दमदार कामगिरी केली होती. मध्यफळीत फलंदाजी करताना सूर्याशने २५१.९२च्या स्ट्राइक रेटने १३१ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळेच आज त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. आज दोघे कशा प्रकारे प्रदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Women’s T-20 World Cup 2026 : फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल? भारतीय संघ (प्लेइंग 11): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (WK), इशान किशन, श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव
आयर्लंड (प्लेइंग 11): टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (C/WK), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फरीज, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा