Headlines

भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात| Maharashtra Times


Sion-Panvel Highway Accident: बेस्ट बसच्या अपघातांची संख्या कमीच होत नाही आहे. मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. यावेळी भरधाव बेस्ट बस एका ६५ वर्षीय पादचाऱ्याला धडकली.

mumbai best bus accident pedestrian dies on the spot two seriously injured
मुंबई: सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर बस रसत्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच, दोन बेस्ट कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यासह पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे सोमवारी सकाळी सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द मेट्रो स्थानकाच्या खाली उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

जखमींवर उपचार सुरू

सोमवारी, २० जुलै रोजी, सकाळी ९.१४ च्या सुमारास बस क्रमांक ५०१ मानखुर्द येथे रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. यामुळे वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर प्रवाशांची मोठा प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी दुभाजकाजवळ उभे असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला धडकली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५ वर्ष) अशी पटली आहे. याशिवाय बसचालक बनवारी श्रीराम प्रसाद वर्मा (वय वर्ष ५१) आणि कंडक्टर वैभव वाघमारे (वय वर्ष ४१) हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील राजावाडी रुग्णालायत दाखल करण्यात आलं असून स्थिती सध्या स्थिर आहे.

याशिवाय इतर पाच जणंही या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवमंगल मैती (४२), गणेश पाटील (२४) , लता वाघेला (४३), राजेश वरुगमिना (३५) आणि अंकिता जाधव (२२) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्यावर सध्या गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मार्गावरील उत्तरेकडील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती आणि त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जूनमध्येही असाच अपघात

या अपघातानंतर मुंबई वाहतूक पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही निर्देश जारी केले होते. मान्खुर्द मेट्रो स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना पर्यीय मार्गांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. अपघातग्रस्त बसला मार्गावरून बाजूला करण्यात आलं असून सध्या संथ गतीने वाहतूक सुरू आहे. या अपघातामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बेस्टच्या एलिक्ट्रिक बसमध्ये अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. जून महिन्यात दादर पश्चिमेतील प्लाझा सिनेमा जवळ बेस्ट बस अपघातात एकाच व्यक्तीचा मृत्यू आणि सहा जणं गंभीर जखमी झाले होते. बेस्ट बसने एका चारचाकी आणि दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात २८ वर्षीय नियाझ अहमदचा जागीच मृत्यू झाला होता. बेस्ट अधिकारी महेश डोईफोडे, सतीश वाघमारे, कंडक्टर राजेंद्र पेलेकर आणि बसचालक विकास पदारे आणि दुचाकीस्वार ऋषभ गुपता हे जखमी झाले होते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा