Headlines

ब्राझील वर्ल्ड कपमधून बाहेर; नेमारकडून निवृत्तीची घोषणा, मॅच संपल्यावर दोनच ओळी बोलला पण सर्वांच्या काळजाला भिडल्या


FIFA World Cup 2026 Neymar Retirement : वर्ल्ड कप 2026 च्या पराभवानंतर नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. ब्राझीलसाठी 130 सामने खेळून 80 गोल करणारा तो देशाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सामन्यानंतर तो काय म्हणाला? जाणून घ्या.

Neymar Retirement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ब्राझीलचा महान फॉरवर्ड नेमार ज्युनियरने इंटरनॅशनल फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 च्या राऊंड ऑफ 16 मध्ये मेटलाइफ स्टेडियममध्ये नॉर्वेकडून 2-1 ने झालेल्या ऐतिहासिक पराभवानंतर रविवारी त्याने हा भावनिक निर्णय घेतला. या पराभवासोबतच पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलचा स्पर्धेतील प्रवास संपला.

सामन्यानंतर नेमार म्हणाला, “मी खूप प्रयत्न केले, पण आता हा प्रवास संपला आहे. मी अमेरिकेच्या भूमीवरच माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि इथेच ती संपवत आहे.” नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात तो सब्स्टिट्यूट म्हणून आला होता. नेमारने २०१० मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी अमेरिकेविरुद्ध ब्राझीलसाठी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना याच ‘मेटलाइफ स्टेडियम’वर खेळला होता. आणि आज १६ वर्षांनंतर त्याच स्टेडियमवर त्याचा शेवटचा सामना ठरला.

स्टॉपेज टाइमच्या 10व्या मिनिटात पेनल्टीवर त्याने गोल केला. हाच त्याचा या टूर्नामेंटमधील पहिला आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा गोल ठरला. नेमारने ब्राझीलसाठी १३०सामने खेळत ८० गोल केले आहेत. जे ब्राझीलच्या इतिहासातील सर्वाधिक आहेत. त्याने ५९ असिस्टही दिले आहेत. २०१३ चा फिफा कॉन्फेडरेशन कप आणि रिओ २०१६ मधील ऑलिम्पिक गोल्ड हे त्याने मिळवलेलं यश आहे.

Maharashtra TimesFIFA World Cup 2026 Tickets : फुटबॉल वर्ल्ड कप सामन्यांची तिकिटे आवाक्याबाहेर, सर्वात स्वस्त तिकीट 3 लाख रुपये
वर्ल्ड कप २०२६ मध्ये दुखापतीमुळे नेमारचं सिलेक्शन शेवटच्या क्षणापर्यंत संशयात होतं. पण कोच कार्लो अँसेलोटीने त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवला. नॉर्वेच्या एर्लिंग हालांडने ७९व्या आणि ९०व्या मिनिटाला केलेल्या दोन गोलांमुळे ब्राझील २-० ने पिछाडीवर गेला. नेमारने पेनल्टीवर २-१ केलं, पण ब्राझीलला वाचवू शकला नाही. १९९० नंतर वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलचा हा सर्वात लवकर झालेला पराभव आहे. सलग सातव्यांदा एखाद्या युरोपियन टीमने त्यांना नॉकआउटमधून बाहेर काढलं आहे. नेमारच्या या निरोपाने जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
Maharashtra Timesप्रसिद्ध फुटबॉलपटूचा करुण अंत, पाच महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; गरोदर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला
दरम्यान, या विजयासह नॉर्वेने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना मेक्सिको विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ‘राऊंड ऑफ 16’ सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. तर ब्राझीलसाठी हा विश्वचषक कायम लक्षात राहील, कारण याच स्पर्धेत देशाच्या एका महान खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला भावनिक निरोप दिला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा