Headlines

पैठणला ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन:गुणवत्तेला चालना; शिक्षक संघटनांकडून सत्कार‎




पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर यशस्वीरीत्या सामायोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित शिक्षकांना सेवेत स्थैर्य मिळाले असून, शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही सामायोजन प्रक्रिया आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील बोंबले, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील गोजरे, मनोज गायके, अतुल पन्हाळकर, भरत मुकुटमल, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण आणि वरिष्ठ सहाय्यक सतीश अखेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पार पडलेल्या या प्रक्रियेत ८ पदवीधर शिक्षक आणि ३९ सहशिक्षक अशा एकूण ४७ शिक्षकांना रिक्त पदांवर समायोजित करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया समुपदेशनाद्वारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली. दरम्यान, या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल एरंडे, राज्य प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, तालुकाप्रमुख कैलास मिसाळ, तालुका संपर्कप्रमुख अमोलराज शेळके, सरचिटणीस लक्ष्मण गलांडे, तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग गोर्डे, तालुका कोषाध्यक्ष प्रल्हाद पाखरे व तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोज अंधारे यांनी समाधान व्यक्त केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत