Headlines

पार्थ पवार-कायनात धार यांचा साखरपुडा ठरला खास; दादांच्या आठवणी मनात ठेवत चेहऱ्यावर हास्य घेऊन सुनेत्रा पवारांचा सुंदर लुक व्हायरल – maharashtra deputy cm sunetra pawar look beautiful in white saree at parth pawar kainat dhar engagement


महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला एक खास सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. या खास प्रसंगी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. सोहळ्यातील अनेक सुंदर क्षण सोशल मीडियावर समोर येत असून, त्यातील एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्या म्हणजे सुनेत्रा पवार.

Sunetra Pawar White Saree Look
फोटो सौजन्य :- @Reels and frames, NCPA,@पाचेंद्रकुमार टेंभरे
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचा पारंपरिक आणि देखणा अंदाज पाहायला मिळाला. पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडीत त्यांचा लूक अत्यंत उठून दिसत होता. साधेपणा, सौंदर्य आणि प्रसन्न हास्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून आला. त्यांच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.या खास दिवशी सुनित्रा पवार यांनी पांढऱ्या रंगाची आकर्षक साडी नेसली होती. साडीवरील नाजूक डिझाइन, पारंपरिक दागिने आणि सोज्वळ मेकअप यामुळे त्यांचा लूक अधिक खुलला होता.

मराठमोळ्या संस्कृतीची झलक त्यांच्या पेहरावातून पाहायला मिळाली.पार्थ पवार यांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी आई म्हणून सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. मुलाच्या नव्या प्रवासाची सुरुवात पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. मात्र, या आनंदाच्या क्षणांमध्ये अजित पवार यांच्या आठवणीही अनेकांच्या मनात होत्या हे त्यांच्याकडे पाहून स्पष्ट दिसत आहे. (फोटो सौजन्य :- @Reels and frames, NCPA,@पाचेंद्रकुमार टेंभरे)

सुनित्रा पवार यांचा पार्थ पवारांच्या साखरपुड्यातील लुक

सुनित्रा पवार यांचा पार्थ पवारांच्या साखरपुड्यातील लुक

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याच्या खास सोहळ्यात सुनित्रा पवार यांचा सोज्वळ आणि आकर्षक लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत होते. साधेपणा, पारंपरिकतेचा स्पर्श आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य यामुळे त्यांचा अंदाज खास ठरला. दागिने, सुंदर मेकअप आणि आत्मविश्वासपूर्ण वावर यामुळे सुनित्रा पवार यांचा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुलाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्या या सुंदर आणि भावूक अंदाजाने सर्वच जण हळवे झाले. (फोटो सौजन्य :- @Reels and frames, @पाचेंद्रकुमार टेंभरे)

खाद्यांवरून घेतलेला पदर

खाद्यांवरून घेतलेला पदर

खांद्यावरून नजाकतीने घेतलेला पदर हा सुनित्रा पवार यांच्या सोज्वळ आणि शाही लूकचा खास आकर्षणबिंदू ठरला. पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडीसोबत त्यांनी घेतलेल्या या पदराच्या स्टाइलने त्यांच्या पारंपरिक सौंदर्यात आणखी भर घातली. पदराची सुंदर घडी, साधे पण उठून दिसणारे दागिने आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य यामुळे त्यांचा लूक अधिक खुलून दिसत होता. मराठमोळ्या संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या अंदाजात सुनित्रा पवार खूपच सुंदर दिसत होत्या. (फोटो सौजन्य :-@पाचेंद्रकुमार टेंभरे)

साडीवरील नाजूक नक्षी

साडीवरील नाजूक नक्षी

साडीवरील नाजूक नक्षीने सुनित्रा पवार यांच्या लूकला अधिक उठावदार आणि आकर्षक बनवले होते. पांढऱ्या रंगाच्या साडीवर केलेले बारकाईने काम, सुंदर डिझाइन आणि त्यातील सूक्ष्म कलाकुसर त्यांच्या पारंपरिक अंदाजाला एक वेगळीच शोभा देत होती. या नाजूक नक्षीमुळे साडीचा साधेपणा कायम ठेवत त्यात एक शाही आणि एलिगंट स्पर्श जाणवत होता. साडीची प्रत्येक घडी आणि त्यावरील कलाकुसर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुंदरपणे जुळून येत होती, त्यामुळे त्यांचा हा लूक अधिक खास ठरला. (फोटो सौजन्य :- @Reels and frames, @पाचेंद्रकुमार टेंभरे)

दादांच्या फोटोंनी पाहून सर्वांचे डोळे पाणावले

दादांच्या फोटोंनी पाहून सर्वांचे डोळे पाणावले

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याच्या आनंदी क्षणांमध्ये अजित दादांच्या आठवणींची भावूक छटा पाहायला मिळाली. सोहळ्यातील दादांचे फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले. कुटुंबासाठी हा क्षण आनंदाचा असला, तरी दादांची उणीव अनेकांना जाणवली. त्या आठवणी मनात ठेवत सुनित्रा पवार यांनी चेहऱ्यावर हास्य कायम ठेवले आणि मुलाच्या आयुष्यातील या खास क्षणाचा आनंद अनुभवला. दादांच्या आठवणींनी भारावलेले हे क्षण उपस्थितांसाठी कायम स्मरणात राहणारे ठरले.

हातमागावर विणलेली सुंदर साडी

हातमागावर विणलेली सुंदर साडी

हातमागावर विणलेली सुंदर साडी ही सुनित्रा पवार यांच्या लूकचे खास आकर्षण ठरली. पारंपरिक कारागिरीचा सुंदर नमुना असलेल्या या साडीतील नाजूक विणकाम, बारकाईने केलेली कलाकुसर आणि आकर्षक पोत यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच शाही झळाळी मिळाली. हातमागाच्या साडीचा साधेपणा आणि त्यातील कलात्मकता यांचा सुंदर संगम त्यांच्या या लूकमध्ये पाहायला मिळाला.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटील“मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे.
खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे.

वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. “आणखी वाचा