Beed Files Marathi Movie:बीड जिल्ह्यात गेल्या काही काळापासून गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर आता बीड फाइल्स या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: बॉलिवूडमध्ये द काश्मीर फाइल्स आणि बंगाल फाइल्स हे सत्य घटनांवर आधारित सिनेमे चांगलेच गाजले. आता सध्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अत्यंत गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीच्या दाहक वास्तवावर भाष्य करणारा ‘ बीड फाइल्स ’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे.
समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना, त्यामागील व्यवस्थात्मक त्रुटी आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेले असुरक्षिततेचे वातावरण यावर हा चित्रपट थेट प्रकाश टाकणार आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजातील वास्तववादी प्रश्नांची मांडणी करणे हा या कलाकृतीचा मुख्य उद्देश आहे.
Shivani Sonar : अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ‘या’ क्षेत्रात काम करायची झी मराठीची नायिका, स्वतःच केला खुलासा ‘बीड फाइल्स’ हा चित्रपट बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि गुन्हेगारी वास्तवाचा वेध घेताना गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या परिस्थितीपासून ते सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेपर्यंतच्या अनेक प्रश्नांना अधोरेखित करणार आहे. नुकतच चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. समोर आलेल्या पोस्टरमध्ये समाजासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर प्रश्नांचे वास्तववादी चित्रण करण्यावर भर दिला असल्याचं दिसतंय.
कलाकारांची नावं गुलदस्त्यात
या चित्रपटाचे निर्माता डॉ. शशिकांत डोईफोडे, सह-निर्माता शिवराज बांगर असून दिग्दर्शन गणेश शिंदे करणार आहेत. या आशयघन चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात बीड जिल्हा वेगवेगळ्या तसंच गंभीर प्रकरणांमुळं चर्चेत राहिला आहे. जिल्ह्यात अवैध धंदे, वाळू उपसा आणि औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राख माफियांच्या वर्चस्वावरून वाद उफाळून येत आहेत. अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून क्षुल्लक कारणांवरून जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना समोर येत आहेत. तर जिल्ह्यात ग्रामपंचायत, स्थानिक राजकारण आणि जुन्या वैमनस्यातून हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत दोन सरपंचांच्या हत्येसह इतर राजकीय वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यांमुळे जिल्हा हादरला होता.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा