Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सावलीला सत्य समजू नका;‎ मूळ अस्तित्व समजून घ्यावे‎




स्वतःची सावली पाहून आनंद होणे ही समजूतदारपणाची गोष्ट आहे.‎पण तिची भीती वाटणे हा अज्ञानाचा भाग आहे. कारण सावलीचे‎अस्तित्व हे देहामुळेच असते. मात्र सावलीलाच देह समजण्याची चूक‎झाली की, भ्रमाला सुरुवात होते. गोस्वामी तुलसीदासांनी प्रभू‎श्रीरामांच्या बाललीलेतून हा जीवनसंदेश दिला ते म्हणतात— “रूप‎रासि नृप अजिर बिहारी, नाचहिं निज प्रतिबिम्ब निहारी. ’राजा‎दशरथांच्या अंगणात विहार करणारे श्रीराम स्वतःचे प्रतिबिंब पाहून‎आनंदाने नाचतात. वरवर ही बाललीला असली तरी तिच्यामागे‎तत्त्वज्ञान आहे. अनेकजण सावली बघण्यात आयुष्य घालवतात. चार‎प्रकारच्या लोकांचे निरीक्षण करा. पर्यटक वेळ घालवण्यासाठी पाहतो.‎प्रवासी नव्या गोष्टींचा शोध घेतो. भाविक तीर्थक्षेत्राच्या अनुभूतीत‎तल्लीन होतो. तर चौथा माणूस या तिघांकडून कोणत्या गोष्टीला खरे‎मानायचे, हे शिकतो. सावलीला नव्हे तर मूळ अस्तित्व जाणून प्रयत्न‎करा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत