मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. कॅप्टन गिलने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताची दमदार सुरूवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सावधपणे राहुलने एक बाजू लावून घेतली होती तर जयस्वाल आक्रमण करत होता. पण ११ व्या ओव्हरमध्ये या जोडीला नजर लागली. काही चूक नसताना यशस्वी जयस्वाल याला माघारी जावे लागले. सर्वांचाच गोंधळ झाला होता पण यजमान श्रीलंकेकडून खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली नाही उलट संधी साधत त्यांनी भारताला यशस्वीच्या रूपाने पहिला झटका दिला.
११ ओव्हरमधील सहाव्या चेंडूवर हा सर्व ड्रामा घडला. केशरा नुवांथा हा गोलंदाजी करत होता, या ओव्हरमध्ये राहुलनेएक चौकार मारला होता. शेवटच्या चेंडूवर राहुल स्ट्राईकवर होता. त्यावेळी सिंगल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न होता, मात्र गोलंदाज नुवांथा चेंडू अडवण्यासाठी गेला तेव्हा जयस्वालच्या पायाला धडकल्याने जयस्वाल खाली पडला. पण राहुलला वाटलेली की सहज धाव पूर्ण होईल म्हणून तो खाली आला पण जयस्वाल पडल्याचं पाहून राहुल थांबला होता, पण पडल्यानंतर पुन्हा उभा राहून जयस्वालने एक पाऊल टाकले त्यामुळे राहुल सरळ पळत खाली नॉन स्ट्राईकएंडकडे परतला पण जयस्वालही माघारी फिरला.
BAN vs AUS Test : पहिल्याच दिवशी तोफखाना घेत उतरलेली ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरूद्ध बॅकफूटवर पण भारताचं टेन्शन का वाढलं? जाणून घ्या दोघेही एकाच दिशने गेले पण राहुलने पहिल्यांदा बॅट टेकवली आणि जयस्वाल मागेच राहिला. फिल्डनरने योग्य थ्रो करत चेंडू कीपरकडे पोहोचवला होता. कीपर डिकवेलाने थोडा विचार केला लगेचच बेल्स पाडल्या नाही, कर्णधाराकडे पाहिलं आणि काही सेकंदात त्याने बेल्स पाडण्याचं ठरवलं. कॅप्टन स्लिपमध्येच उभा होता, त्याच्याच इशाऱ्यानंतर कीपरने आऊट केलं. पण इथे श्रीलंकेच्या कर्णधाराने खिलाडूवृत्ती दाखवणं अपेक्षित होतं. त्यामुळे ३७ चेंडूत ३५ धावांवर खेळणाऱ्या जयस्वालला माघारी जावे लागले. आपल्या खेळीत त्याने ५ चौकार लगावले होते.
भारत (प्लेइंग 11): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (C), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा