Headlines

नीरज चोप्रा लुसाने डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी:88.05 मीटर भाला फेकला, श्रीलंकेच्या रुमेश पथिरागेने पटकावले विजेतेपद




भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लुसाने डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.05 मीटर भाला फेकला. 28 वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम थ्रो फेकला. हा त्याच्या या हंगामातीलही सर्वोत्तम थ्रो ठरला. पण, तो श्रीलंकेच्या रुमेश पथिराजेपेक्षा फक्त 9 सेंटीमीटरने मागे राहिला. पथिरागेने 88.14 मीटरसह विजेतेपद पटकावले. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स 86.69 मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला. पथिरागेने गेल्या महिन्यात ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पथिराजेची तिसऱ्या फेरीत आघाडी 23 वर्षीय रुमेश पथिराजेने तिसऱ्या फेरीत 88.14 मीटरचा थ्रो केला. या कामगिरीसह त्याने नीरजला मागे टाकून पहिले स्थान पटकावले आणि विजेतेपद जिंकले. पथिराजे या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. लुसाने येथे त्याने नऊ स्टार खेळाडूंच्या स्पर्धेत पहिले स्थान पटकावले. नीरजचा डायमंड लीगमध्ये दुसरा सर्वोत्तम थ्रो नीरजची 88.05 मीटरची फेक जून 2025 मध्ये पॅरिस डायमंड लीग जिंकताना केलेल्या 88.16 मीटरच्या कामगिरीनंतरची सर्वोत्तम होती. मात्र, झुरिचमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला होता.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत