निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय द्यायचा ठरवलं मग तर्क लावले, सिब्बलांचा घणाघात – shiv sena supreme court hearing kapil sibal argument on 12 august
निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय द्यायचा ठरवलं मग तर्क लावले, सिब्बलांचा घणाघात – shiv sena supreme court hearing kapil sibal argument on 12 august
शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाचे? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि नाव आणि चिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आज या प्रकरणाच्या चौथ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयातील उणिवा आणि विरोधाभास कोर्टासमोर मांडले. निवडणूक आयोगाने विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षघटना आणि संघटनात्मक रचना कशी बाजूला ठेवली, प्राथमिक सदस्यसंख्येचा विचार कसा दुर्लक्षित केला आणि केवळ विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर कसा निर्णय दिला, यावर सिब्बल यांनी बोट ठेवले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत – कोर्टात कपिल सिब्बल यांनी नक्की कोणते मुख्य युक्तिवाद केले, न्यायमूर्तींनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि या सुनावणीचे राजकीय व कायदेशीर अर्थ काय आहेत!