Navi Mumbai Airport Passengers: नवी मुंबई विमानतळावरून घरी जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. आता प्रवाशांची संख्या वाढणार असून काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सहसा विमानतळावर पोहचून संपतो. पण नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांची खरी परीक्षा तर त्यानंतर सुरू होते. नवी मुंबई विमानतळ एप्रिल अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या तयारित असताना, सध्याच्याच प्रवाशांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव आहे. विमानतळावरून बाहेर निघताच प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी कॅब-टॅक्सीची व्यवस्था करताना प्रवाशांच्या अगदी नाकिनऊ येत आहेत.
11 नंतर बस सेवा नाही
सध्या प्रवासी मोठ्या प्रमाणात अॅप-आधारित टॅक्सी-कॅब सेवांचा वापर करून विमानतळावरून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु, अनेक मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे कॅब बुक करणं कठीण होत आहे. त्यात ज्यांना नेटवर्क उपलब्ध होत आहे त्यांच्या कॅब उशीराने येत असून मोजके चालकच वेळेवर येतात. सरकारी बस सेवा उपलब्ध असल्या तरी रात्री 11 नंतर या सेवा बंद होत असल्यामुळे प्रवाशांना रात्री-अपरात्री घरी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते आहे.
त्यात, नवी मुंबई विमानतळावरून कॅब बुक करण्यासाठी प्रवाशांना वेगळ्याच घाम गाळावा लागतो आहे. इथे प्रवाशांना टोकन आधारित प्रणालीचा वापर करावा लागतो. एकदा अॅपवरून कॅब बुक केल्यास प्रवाशाच्या मोबाइलवर एक टोकन येतं. त्या टोकनच्या आधारे त्यांना रांगेत एक क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकानुसार त्यांना पिक-अप स्पॉटवर जाऊन उभे रहावे लागते. त्यानंतर कॅबच्या उपलब्धतेनुसार प्रवाशांना कॅब देण्यात येते. यामुळे अनेक वेळा प्रवासी मोठ्या संख्येने रखडत असून कॅबची वाट तासांतास पहावी लागते.
कॅबही विलंबाने
गर्दीवर नियंत्रण ठेऊन प्रवास सुलभ करण्याच्या हेतूने ही प्रणाली सुरू केली गेली होती. परंतु अनेक प्रवाशांना कॅबसाठी 40 – 40 मिनिटे वाट पहावी लागली असल्याचे सांगितले आहे. त्यात कॅब बुक करताना अनेक वेळी कमी किमतीचे पर्याय अनुपलब्ध होतात. त्यामुळे प्रवाशांना प्रिमियम राइड निविडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. यामुळे प्रवाशांची लूट सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत.
विमानतळावर रखडलेले प्रवाशांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे काहीही किंमत असली तरी कॅब निवडून प्रवास करावा लागतो. एका प्रवाशाने तर रात्री उशीरा विरारपर्यंत जाण्यासाठी तब्बल 6,000 रुपये मोजले असल्याची माहिती दिली आहे. एप्रिल नंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होणार आहे. त्यानंतर प्रवाशांची संख्या दुप्पट होणार आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत 24 तास उड्डाणांना देखील सुरूवात होईल. अशा वेळी वाढत्या प्रवाशांच्या लास्ट माइल कनेकटीव्हीटीसाठी प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा