Headlines

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तरीही उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री शाहांना सुनावलं; उद्याच्या मुंबईतील मोर्चाबाबतही भूमिका स्पष्ट


Uddhav Thackeray On Dharmendra Pradhan Resignation : नीट आंदोलनाच्या यशानंतर उद्धव ठाकरेंनी ‘एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले’ म्हणत सरकारवर निशाणा साधला. तसेच पोलिसांच्या कारवाईवरून अमित शहांना सवाल करत मुंबईतील मोर्चा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट केले.

Uddhav Thackeray On Dharmendra Pradhan Resignation
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणी महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी, आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. याच मुद्द्यावर पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपोषण केले होते. वांगचुक यांनी २३ जुलै रोजी उपोषण मागे घेतले असले, तरी अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते. अखेर चौफेर वाढत्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून, या निर्णयानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर मोठा जल्लोष केला. यापार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके, देशातील तरुण आणि त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या पालकांचे मनापासून अभिनंदन करायला हवे, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता, तर या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, तेव्हा ते बोलत होते.

‘एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले’

“गेल्या १२ वर्षांपासून रोज काही ना काही दबाव जनतेवर टाकला जात होता. जणू काही या देशात आता लोक शिल्लक राहिलेलीच नाहीत आणि विरोधकांना किंवा जनतेला ‘झुरळ’ समजून सत्तेतील मंडळी वागत होती. एका लहानशा संघर्षाने किंवा ‘झुरळाने’ हुकूमशहाला झुकवल्याचे दाखवून दिले आहे. देशातील युवाशक्ती एकत्र आली तर काय करू शकते, याची ही एक झलक आहे.” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Maharashtra TimesAbhijeet Dipke : काय म्हणायचे? या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत! प्रधान पायउतार होताच अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, CJP चा मोठा विजय

पोलिसांच्या कारवाईवरुन अमित शहांना सवाल

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी या आंदोलनादरम्यान समोर आलेल्या भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीवर उद्धव यांनी प्रश्न उपस्थित केले. “आंदोलक तरुणांवर आणि युवतींवर झालेला लाठीचार्ज, तसेच साध्या वेषात गुंड घुसडल्याचा आरोप करत या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का”, असा सवाल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारला. तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही आणि पोलिसांच्या दंडुकशाहीवर कारवाई झाली नाही, तर हा तरुण वर्ग आपला मोर्चा अमित शहांकडे वळवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Maharashtra TimesDharmendra Pradhan: सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश; मोदी सरकार झुकलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

‘मुंबईत उद्याचा मोर्चा ठरल्याप्रमाणेच होणार’

दरम्यान, उद्या (२५ जुलै) शिवाजी पार्क मैदानावर, वीर सावरकर मार्गावरचा मोर्चा आणि सभा ठरल्याप्रमाणे होणार असून, यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंकडून करण्यात आले आहे. युवाशक्तीची ताकद संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी मुंबईतील नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच पार पडणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा