Headlines

दुबईस्थित मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा, लॉक अप 2 मध्येच अर्जुन कपूरला प्रपोज, कपूरांची सूनबाई आहे तरी कोण?| Maharashtra Times


नेटफ्लिक्सचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’ सुरू झाल्यापासून, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि दुबईस्थित सुंदरी पामेला सेरेना यांच्यातील संबंधांबाबत चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या शोदरम्यान पामेलाने अर्जुनला लग्नासाठी मागणी घातली होती आणि अर्जुनने दिलेल्या प्रतिसादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तेव्हापासून, हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, अशा सर्व चर्चांना पूर्णविराम देत या सुंदरीने स्वतःच त्या अभिनेत्यासोबतच्या आपल्या संबंधांबद्दल बोलली आहे. अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टवर तिला विचारण्यात आले की ती अर्जुनला डेट करत आहे का, तेव्हा पामेलाने सांगितले की ती त्याला बऱ्याच काळापासून ओळखते.

Maharashtra TimesSaif Ali Khan First Wedding : सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या लग्नाला गेल्या नव्हत्या सख्ख्या बहिणी सबा आणि सोहा, 35 वर्षांनी सांगितलं खरं कारण

पामेला सेरेना अर्जुन कपूरला डेट करत आहे का?

यावर ती म्हणाली, “लॉक अप सीझन 2 पूर्वी एका कार्यक्रमात तिची आणि अर्जुन कपूरची भेट झाली होती. त्यावेळी सुनीता आहुजा तिची गंमत करत म्हणायच्या की, पामेलाचे सहा महिन्यांच्या आत लग्न होईल. जेव्हा ती विचारायची की तो मुलगा कोण असेल, तेव्हा सुनीता गंमतीने सांगायच्या की त्याचे नाव ‘A’ या अक्षरावरून सुरू होईल.”

पामेला पुढे म्हणाली, “जेव्हा शोच्या निर्मात्यांना हे समजले, तेव्हा त्यांनी अर्जुनला शोमध्ये आणले. त्यामुळे, आमच्यात आधीपासूनच काहीतरी सुरू आहे असा सर्वांचा समज झाला, पण तसे काहीही नाही.” लॉक अप 2 च्या सक्सेस पार्टीमध्ये तिच्या आणि अर्जुन कपूरमधील ‘केमिस्ट्री’बद्दल बोलताना पामेला म्हणाली, “आम्ही बोलत असताना सगळेच आमच्याकडे पाहत होते; काहीजण व्हिडिओ रेकॉर्ड करत होते, तर काहीजण आमच्याकडे बघून हातांनी ‘हार्ट’चा शेप बनवून दाखवत होते.”

Maharashtra TimesChiyaan Vikram : माकडासोबतचा व्हिडिओ टाकून पुरता फसला अभिनेता! वनविभागाची कारवाई, दुर्मिळ जातीच्या वानराच्या तस्करीचा संशय
पामेला पुढे सांगतले की, “शोमध्ये अर्जुनने आकांक्षा चमोलाला सांगितले, ‘आपली पसंती सारखीच आहे. पामेलाला माझ्यासाठी सुरक्षित ठेव.'” हे सांगताना ती हसली. पामेलाने हे देखील नमूद केले की ती आणि आकांक्षा चमोला खूप जवळच्या मैत्रिणी आहेत; शोमध्ये त्या दोघी आपला बहुतेक वेळ एकत्र घालवत होत्या आणि एकमेकींची सोबत एन्जॉय करत होत्या.

पामेला सेरेना कोण आहे?

दुबई स्थित पामेला सेरेना ही एक प्रसिद्ध ‘सोशलिस्ट’ (सामाजिक व्यक्तिमत्त्व), ब्युटी क्वीन, व्यावसायिक आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार ही सुद्धा तिची ओळख आहे. भारतीय वंशाच्या कुटुंबातून असली तरी तिचा जन्म युनायटेड किंगडममध्ये झाला. 2012 पासून ती दुबईमध्ये राहत आहे. तिने ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’मधून मानसशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त, पामेलाने ‘मिसेस युनिव्हर्स दुबई 2021’ आणि ‘मिसेस यूएई वर्ल्ड 2022’ सारखे प्रतिष्ठित किताब जिंकले आहेत. ती महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.

नेटफ्लिक्सचा शो ‘देसी ब्लिंग’ आणि ‘लॉक अप 2’ यांमुळे पामेलाला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘लॉक अप’ 2 च्या ‘जजमेंट डे’ या भागात, अर्जुन कपूर शोमध्ये येताच दुबईस्थित ग्लॅमरस पामेला सेरेनाशी संवाद साधू लागला. संभाषणादरम्यान, पामेलाने गंमतीने अर्जुन कपूरला लग्नासाठी प्रपोज केले. हे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला की शोमध्ये आधीच खूप ड्रामा आणि वाद सुरू आहेत. या प्रपोजलला विनोदी स्टाइलने प्रतिसाद देत अर्जुन कपूर म्हणाला, “मी पूर्णपणे तयार आहे; शेवटी, हा तरुण आता लग्नाच्या वयात आला आहे.” अर्जुन कपूरचे हे बोलणे ऐकून पामेला सेरेना लाजून लाल झाली.