Headlines

दवाखाने आणि त्यांची डॉक्टरकी, ‘आय अॅम सॉरी’ एवढंच बोलायचं अन्.., छोट्या पडद्यावरच्या वैद्यकीय विश्वाच्या काही रंजक गोष्टी


काही कारणास्तव मालिकेच्या नायिकेचं लग्न मोडतं. तिची आई त्या धक्क्यानं कोलमडते आणि तिला थेट दवाखान्यात दाखल करावं लागतं. मग संकटातून नायिकेला बाहेर काढण्यासाठी नायक येणार नाही? हे कदापि शक्य नाही. शेवटी तो येतो आणि थेट तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेऊन टाकतो. हे सारं नाट्य कुठे घडतं तर दवाखान्यात. ड्रामा इथेच संपत नाही… नायक, नायिका एकमेकांना हार घालतात आणि फेरेही घेतात तेही नायिकेची आई अॅडमिट झालेल्या पलंगाभोवती! भुवया उंचावल्या ना… हा आहे सध्या सुरू असलेल्या एका मराठी मालिकेतला प्रसंग. एरव्ही खऱ्या आयुष्यात रुग्ण गंभीर असताना दवाखान्यातील कर्मचारी त्यांच्या आसपासही फिरकू देत नाही; मात्र आमच्या टीव्हीच्या दुनियेत काहीही होऊ शकतं, याचं हे ताजं ताजं उदाहरण.

कोणत्याही मालिकेत रंजक वळण येणार असलं, की बऱ्याचदा काहीतरी धमाकेदार घडतं आणि कोणतं तरी एक पात्र स्वतःचा जीव धोक्यात घालतं आणि रुग्णालयात दाखल होतं. ‘इथे गर्दी करू नका’, ‘रुग्णांसोबत एकाच नातेवाईकानं थांबा’ किंवा ‘भेटण्याची वेळ संध्याकाळी ४ ते ७’ असं खऱ्या आयुष्यामध्ये दवाखान्यातील कर्मचारी वर्ग सतत ओरडून सांगत असतो. पण आमच्या मालिकेची गोष्टच वेगळी आहे ना! तिथे अख्खच्या अख्खं कुटुंब आम्ही कसे ‘हम साथ साथ है’ आहोत; हे दाखवायला उपस्थित असतं. आयसीयूचे नियम किती कडक आणि कठोर असतात हे सर्वांनाच माहिती आहेत. पण… अंहं… आमच्या मालिकेत ‘कुणीही यावे आणि टपली मारूनि जावे’ या उक्तीनुसार ‘कुणीही आयसीयूमध्ये यावे आणि ऑक्सिजन मास्क काढावे’ हे सुरूच असतं. त्या कुटुंबात एक तरी जण असा किंवा अशी असतेच; जिचा किंवा ज्याचा त्या रुग्णाच्या मरणानं फायदा होणार असतो. पण तो हरत-हेनं तिथवर पोहोचतोच पोहोचतो. बरं गोष्ट इथे संपत नाही. हा मारामारीचा खेळ सुरू करण्याआधी कधीकधी एखादं नाटकही रंगतं. मग त्या खलवृत्ती असलेल्या पण आमच्या मालिकेची गोष्टची वेगळी!

National Doctors day

Maharashtra TimesEla Bhate : पार्ले बिस्किटाच्या नुसत्या वासावर आम्ही मोठे झालो आहोत! इला भाटेंनी सांगितली आठवण
व्यक्तीला तिथल्या परिचारिकेचे कपडेही पटापट मिळतात, ती ते परिधान करते आणि तिथल्याच कर्मचाऱ्यांना फसवते वगैरे सगळं काही शिस्तीत दाखवलं जातं. खऱ्या दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे कपडे, वस्तू किंवा अन्य सामग्रीपर्यंत जाण्याची कोणाची विशाद तरी असते का?

Maharashtra TimesVijaya Mehta: आई गमावल्याचे दु:ख, माझी अवस्था धक्का बसण्यापलीकडची, बाईंच्या जाण्याने सगळे काही संपले; नाना पाटेकर भावुक
आपले खऱ्या आयुष्यातले डॉक्टर रुग्णांना विशिष्ट वेळी येऊन तपासतात आणि वैद्यकीय भाषेत मुद्देसूद पद्धतीनं रुग्णाची सद्य परिस्थिती कुटुंबीयांना समजावून सांगतात. मालिकेत असं नसतं हो… काहीतरी हट के हवं की! ‘आम्ही आमचे सगळे प्रयत्न केले.. आता तुम्ही सगळं देवावर सोडा’, हा संवाद हवाच हवा. एकवेळ तुम्ही इतर मुख्य पात्रांचे सगळेच्या सगळे संवाद वगळले तरी चालतील; पण देवावर सोडण्याचा संवाद इज मस्ट! खऱ्या आयुष्यात अनेकदा रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर असते. सलाइन असतात. रुग्ण जागचा हलूही शकत नाही. त्याला लावलेली सलाइनची सुई काढण्यासाठी परिचारिकेला प्रत्येक वेळी बोलवावं लागतं. मालिकेतील नायिका किंवा नायक मात्र एखाद्या ठिकाणी जायचं म्हणून सटासट ते काढतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहतातसुद्धा! आश्चर्य तर पुढेच आहे; तसं केल्यानं रक्ताचा एक थेंबही दिसत नाही.

शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात; पण मध्यमवर्गीयानं दवाखानाही गाठू नव्हे असंही आता म्हणू लागले आहेत. याच्या मागचं कारण म्हणजे उपचारासाठी होणारा खर्च. खऱ्या आयुष्यात बऱ्याचदा बिलाची मोठी रक्कम होत असली, तरी मालिकेतला दवाखाना एकदम स्वस्त आहे. कोणत्याही मालिकेत दवाखान्याचं उपकथानक आलं, की त्यासाठी असलेल्या विशिष्ट सेटवर चित्रीकरण केलं जातं. त्या सेटचं दिवसाचं भाडं साधारण तीन ते चार हजार इतकं असतं. यामध्ये ऑपरेशन थिएटर, वॉर्ड, इतर साधनं, मशीन हे प्रसंग असेल, तर मात्र नेहमीच्या ठिकाणी आवश्यक ती साधनसामग्री मागवून तसा सेटअप केला जातो. मुंबईत एसजे स्टुडिओ, फिल्मसिटी, बसरा अशा काही ठिकाणी दवाखान्याचे सेट आहेत. एका मालिकेत पाहिलेला डॉक्टर कधीकधी दुसऱ्या मालिकेतही दिसतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन फक्त ‘आय अॅम सॉरी’ एवढंच बोलायचं असेल, तर ही डॉक्टर मंडळी ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ मधून निवडली जातात. पण मालिकेत त्या डॉक्टरांचं उपकथानक पुढील अनेक भाग दिसणार असेल, तर मात्र प्रस्थापित कलाकारांना घेतलं जातं.

तर, असे हे आमच्या मालिकेतले दवाखाने आणि त्यांची डॉक्टरकी…! रंजक वळणाचा महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या मालिकांमधील दवाखान्याचं उपकथानक विविध गोष्टींनी फुलवलं जातं. त्यातलं हे वैद्यकीय विश्व आम्ही खास तुमच्यासाठी उलगडलं ते आज असलेल्या ‘ नॅशनल डॉक्टर्स डे ‘च्या निमित्तानं!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत