Headlines

तिरोडा-नानोस मार्गावरील पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी


सावंतवाडी, प्रतिनिधी : तिरोडा व नानोस गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची ठरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत तिरोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी शेटये, उपसरपंच अनिता नाणोस्कर तसेच सदस्य रसिका जोशी, सुधाकर नाणोस्कर आणि रघुनाथ जोशी यांनी आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांचे लक्ष वेधले आहे.

यासंदर्भात या शिष्टमंडळाने आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि गजानन नाटेकर यांच्याकडे निवेदन सादर केले. पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत