Headlines

डेगव्यातील शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणेंची मुंबईत धाव


बांदा/प्रतिनिधी : डेगवे येथील जिल्हा परिषद शाळांच्या छप्पराची अत्यंत दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख . नारायण राणे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी डेगवे येथील शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी ‘खास बाब’ म्हणून तातडीने निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे केली. शिवसेना तालुकाप्रमुखांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत, मंत्री महोदयांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणात “तात्काळ कार्यवाही करावी” असे लिखित आदेश दिले आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या पत्रात डेगवे गावातील दोन शाळांची भीषण परिस्थिती मांडली आहे मोयझरवाडी जि. प. शाळा क्र. २: या शाळेचे छप्पर गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्री घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवितहानी झाली नाही.आंबेखणवाडी जि. प. शाळा क्र. ३ या शाळेचे छप्पर देखील पूर्णपणे मोडकळीस आले असून सध्या ते ताडपत्री घालून झाकून ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी येथे मोठा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.
​ या दोन्ही शाळांचा संभाव्य धोका आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लाकडी छप्पराऐवजी नवीन लोखंडी छप्पर करणे अनिवार्य आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे तातडीचा निधी मंजूर करावा, अशी विनंती नारायण राणे यांनी नामदार दादाजी भुसे यांच्याकडे केली.
​मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद. दादा भुसे साहेबांनी पत्रावरच “मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग – तात्काळ कार्यवाही करावी” असा स्पष्ट शेरा मारून प्रशासनाला गतीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. यामुळे डेगवे गावातील दोन्ही शाळांच्या छप्पर दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामस्थ व पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत