मुंबई:नवी दिल्लीतील जंतर-मंतर इथं NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचं आंदोलन पेटलं असून, त्याचे पडसाद आता संपूर्ण देशभरात आणि मनोरंजन विश्वात उमटू लागले आहेत. या आंदोलनावर आणि पोलिसांच्या कारवाईवर महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी कलाकारांनी तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील त्यांच्या शैलीत या सगळ्यावर भाष्य केलंय.
सचिन गोस्वामी हे सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर नेहमीच व्यक्त होत असतात. आता त्यांनी दिल्लीतील आंदोलनावरही भाष्य केलंय. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.
एका पोस्टमध्ये सचिन गोस्वामी यांनी म्हटलं की, आदर्श व्यवस्था अशी असावी.. ज्यात शिक्षण मंत्र्याच्या मुलाना उत्तम शिक्षणासाठी परदेशी जावे लागू नये..आपल्या बाबाने देशात निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण केंद्रातच ते मिळावे.ज्यात गृहमंत्र्याना ,अन्य मंत्र्यांना अनावश्यक सुरक्षा ताफ्यात फिरावे लागू नये ,त्यानीच निर्माण केलेल्या शांत ,सुरक्षित कायद्याच्या राज्यात निवांत फिरता यावे,चौपाटी वर भेळ खात जागता यावं तुमच्या आमच्या सारखं.
आरोग्य मंत्र्याच्या कुटुंबाला उपचारा साठी परदेशात नाही तर त्यानेच उभारलेल्या जागतिक दर्जाच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये घेता यावेत उपचार.आपल्या आया,बहिणी,मुली निश्चिंत ,आणि सुरक्षित होऊन जगाव्यात आपल्या कर्त्याने निर्माण केलेलं हे आदर्श राज्य बघत.
शेवटी राजकारणी,नेते ही समाजाचा भागच आहे..फक्त त्यांच्या कडे आपल्या जनसामान्या पेक्षा हे राष्ट्र सुराज्य बनवावे याची एक संधी जास्त आहे.तिचं सोनं केलं पाहिजे.खरे रामराज्य हेच आहे.शांत ,आनंदी, समताधिष्ठित समाज आणि अहंकार नसलेलं कार्यक्षम ,नेतृत्व .स्वप्नवत आहे,पण आशा आहे.
तर दुसरी एक पोस्ट शेअर गोस्वामी म्हणतात की, अंगठ्यात मेंदू असलेल्या झोंबींसाठी …अनेकांनी आपला मेंदू नेत्याच्या चरणी अर्पण केलाय.सध्या वरून आलेले युक्तिवाद अंगठ्यानी फॉरवर्ड करणे येव्हडंच चाललय.जरा मेंदू ताब्यात घ्या,वापरा.फ्रेश वाटतं ..अनुभव घ्या.आपला मेंदू आपल्या डोक्यात असण्यासारखा आनंद नाही.
सचिन गोस्वामी यांच्या या दोन्ही पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा