Headlines

गोकृपा अमृतम शिबिरे गावागावात होणार!


ओटवणे प्रतिनिधी : नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीकडे वाटचाल करावी. त्यासाठी कृषी विभागामार्फत अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम पुढील काळातही विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे यांनी दिली.

असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘गोकृपा अमृतम’ निर्मितीचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबिरात गोरखनाथ गोरे बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुका सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद निकम, बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईम्बर, उप कृषी अधिकारी मनाली परब, असनिये हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत, समीर कोलते, बबी सावंत आदी उपस्थित.होते.

देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ, ताक आणि पाणी यांचा वापर करून ‘गोकृपा अमृतम’ घरच्या घरी कसे तयार करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तयार करण्याची पद्धत, योग्य प्रमाण, वापरण्याची वेळ तसेच विविध पिकांमध्ये त्याचा उपयोग कसा करावा, याविषयी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व समजावे आणि भविष्यात त्यांनीही नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करावा या उद्देशाने य
यावेळी सेंद्रिय गटांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यातर्फे सेंद्रिय गुळ व ताक याचे वितरण करण्यात आले. नैसर्गिक शेतीचा संदेश ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.यावेळी कु वेदांगी विनायक कोळापटे हिने कृषी विभागाचे आभार मानले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत