Headlines

गोंदियात ओबीसींचा महाआक्रोश मोर्चा; भाजप-काँग्रेसचे नेते एकवटून मांडली भूमिका, काय आहेत मागण्या? – obc community massive protest march in gondia bjp and congress leaders jointly presented stand


२०१६-१७मध्ये मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यापासून विरोधात होतो. तेव्हा कुणीही समजून घेतले नाही. मराठा समाजाला आमच्यातील एक टक्काही देणार नाही,’ अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मांडली.

maratha obc
maratha obc(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करून गोंदिया जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजबांधवांनी रविवारी महाआक्रोश मोर्चा काढला. कुडवा नाका ते जयस्तंभ चौकादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. घोषणांनी वातावरण तापले होते.

सकल ओबीसी समाजाने आंदोलनाची हाक दिल्यानंतर रविवारी सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी समाजबांधव गोंदियाच्या कुडवा नाका परिसरात एकत्र आले. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार नामदेव किरसान, आमदार परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजकुमार बडोले, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार दिलीप बनसोड, माजी आमदार गोपालदास अग्रवाल या नेत्यांनीही हजेरी लावली.
Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: तुला बघून घेतो; रस्त्यात गाठलं अन् मेकअप आर्टिस्टवर हल्ला, हातातील कडा डोक्यात घातला, कारण काय?
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. हा समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत सकल ओबीसी संघटनांनी येत्या दहा ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम ते संविधान चौकादरम्यान महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मराठा समाजाला ओबीसींत सामावून घेण्याच्या निर्णयाला सुरुवातीपासून आमचा विरोध आहे.

लढ्यात सोबत तोच आपला : वडेट्टीवार
पक्ष बाजूला ठेवून लढाईत सहभागी होणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी पुढाकार घेईल, सोबत येईल तोच आपला आहे. काही लोक या शासन निर्णयाचे समर्थन करून समाजाची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ हा आमचा हक्क आहे, असे ते म्हणाले.
Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: तरुण शेतात गेला अन् नको ते केलं; आई-वडील आणि भावंडांचा मन हेलावणारा आक्रोश
मागण्या काय ?
सरकारने तत्काळ जातनिहाय जनगणना करावी
५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे
मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे
२ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा