अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सोलापूर आणि नागपुरात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री सुरु होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यात “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र” या मोहिमेंतर्गत नागरिकांचे आरोग्याचे संरक्षण व संवर्धन होण्यास गुणवत्तापूर्ण औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत, यासाठी बेकायदेशीर प्रकरणाचा शोध घेऊन त्याविरुद्ध कठोर कारवाई घेण्यात येत आहे. 12 ऑगस्टला Clear Kit आणि Prega End या गर्भपातासाठी वापरत येणाऱ्या औषधाच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी नागपूर आणि सोलापूर कार्यालयाद्वारे कारवाई करण्यात आली.
नागपुरात मोठी कारवाई
नागपूर शहरात विनापरवाना औषधांची साठवणूक करून, विशेषतः अवैधरित्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या किट्सची (Medical Abortion Kits) छुप्या पद्धतीने खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन नागपूर यांनी पोलिसांसह संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे.
नेमकी कारवाई कशी केली?
नागपूरच्या औषध निरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, नागपुरातील विनोबा भावे नगर येथील डॉ. सचिन मरघडे ‘श्री साई दवाखाना’ येथे आकस्मिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दवाखान्यात विनापरवाना मोठ्या प्रमाणावर औषधी विक्रीकरिता साठवून ठेवल्याचे आढळून आले. तसेच, गर्भपातासाठी वापरली जाणारी Prega End Kit आणि Misopril Kit यांवर उत्पादकाचे लेबल आणि बॅच नंबर (Batch No.) जाणीवपूर्वक खोडलेले किंवा काळ्या शाईने लपवलेले आढळले.
पुरवठा साखळीच्या पुढील चौकशीत सहभागी असलेल्या दोन आरोपींना नागपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे अनुक्रमे 6 व 44 MTP kit बेकादेशीरपणे बॅगेत बाळगण्यात असल्याचे आढळून आले. सदर MTP kit पुरवठा करणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांचे स्तरावर सुरु असून पुढील कारवाई प्रस्तावित आहे.
डॉक्टरसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल
या कारवाईत डॉ सचिन मरघडे दवाखान्यातून विनापरवाना साठा करण्यता आलेल्या Alprazolam व Sildenalfil या औषधासह एकूण रु. 45,649 किमतीचा विनापरवाना औषध साठा जप्त करण्यात आला आहे. यशोधरा नगर पोलीस ठाणे, नागपूर येथे भारतीय न्याय संहिता 2023 व NDPS कायदा 1985 च्या विविध कलमांखाली डॉक्टरसह इतर 3 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याखाली विनापरवाना औषधे साठवणूक व विक्री करणे या उल्लंघनासाठी स्वतंत्र कारवाई घेण्यात येत आहे.
सोलापूर येथेदेखील मोठी कारवाई
अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय, मुंबईकडून प्राप्त माहितीनुसार, सोलापूरमधील एक व्यक्ती ‘इंडिया मार्ट’ (India-MART) या ऑनलाईन पोर्टलचा वापर करून ग्राहकांना बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या औषधांची विक्री करत असल्याचे आढळून आले. सोलापूरचे औषध निरीक्षक आणि पोलीस पथकाने आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून विनापरवाना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला 26 MTP kit चा रु.9532 किमतीचा औषधसाठा पंचनामा करून जप्त करण्यात आला.
सदर साठा परराज्यातून प्राप्त झाल्याची माहिती मिळाल्याने व India MART या online portal चा सहभाग असल्याचे दिसून आल्याने India MART चे संचालक व इतर 3 आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. वरील दोन्ही प्रकरणी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याखाली विनापरवाना औषधे साठवणूक व विक्री करणे या उल्लंघनासाठी स्वतंत्र कारवाई घेण्यात येत आहे.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“विनापरवाना किंवा ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय MTP Kit सारखी गर्भपाताची औषधे खरेदी करून त्याचा प्रशिक्षित व मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकच्या देखरेखीखाली वापर न करणे यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशाप्रकारच्या औषधाची बेकायदेशीर खरेदी व विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर असून कठोर कारवाई घेण्यात येत आहे”, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा