Headlines

गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा हायवेवर सरकारचं नियोजन, गृहरक्षक दलाचे चारशे जवान, एसआरपीएफ तुकडीही तैनात


Mumbai–Goa Highway : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना कोकणकरांची गावी जायची लगबग सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमाणी गावी लोटतात. त्यामुळे कोकणातील महामार्गावर अनेक समस्या निर्माण होतात.प्रवाशांचा हेणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने मुंबई -गोवा महामार्गावर नियोजन केले आहे. त्यामुळे कोकण मार्गावर आता योग्य सुविधा उपलब्ध असणार आहेत.

कोकण मार्गावर सुविधा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, अलिबाग:‘गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन मदतीचे सूक्ष्म नियोजन करावे’, असे निर्देश रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले. महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांवर दिशादर्शक फलक, वाहतूक मार्गदर्शन, क्रेन आणि रुग्णवाहिकांची सक्षम व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शांतता समितीची बैठक

जिल्हा नियोजन भवन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात सात पोलिस उपनिरीक्षक, १२८ पोलिस अधिकारी, १,९०० पोलिस अंमलदार, गृहरक्षकदलाचे चारशे जवान आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २५ मोटरसायकली, २० टोइंग क्रेन आणि २० रुग्णवाहिका सज्ज असतील.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, मराठी नाही आली तरी वर्षभर कारवाई होणार नाही

महिला व बालकांसाठी सुविधा

खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, पोलिस मदत कक्ष, महिला व बालकांसाठी सुविधा आणि वाहनांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध असतील.

समिती सदस्यांना ओळखपत्र

‘आत्तापर्यंत ३६ शांतता समिती, ३० मोहल्ला समिती, १३७ गणेश मंडळे आणि १२५ गावबैठकाघेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शांतता समिती सदस्यांची पोलिस पडताळणी पूर्ण करून त्यांना ओळखपत्रे द्यावीत, तसेच स्थानिक खासगी बचाव पथकाशी समन्वय साधावा’, असे निर्देशही गोगावले यांनी दिले.

Maharashtra Timesदिवस सरले, आकडे फिरले! आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात ‘उलटा’ निकाल; काय सांगतो सर्व्हे?

महामार्गावरील खड्डे बुजवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- गोवा महामार्गावरील खड्डे आणि अन्य अडचणीत तातडीने दूर करण्याच्या सूचना गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. पनवेल- पळस्पे येथून माणगावपर्यंत महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी निर्माण होते. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कामे वेगाने पूर्ण करावीत असे आदेश त्यांनी दिले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा