Headlines

काळ आला होता पण वेळ नाही! नेपाळच्या महाप्रलयात चहाच्या ब्रेकमुळे 5 जणांचे वाचले जीव, रात्रीचा थरार


काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराने अनेकांचा जीव घेतला, युद्धपातळीवर बचाव पथक बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. अनेकांचे दैवबलवत्तर म्हणून जीव वाचले, अशाच प्रकारे चहा पिण्यासाठी घेतलेल्या ब्रेकमुळे नेपाळमध्ये ५ जणांचे प्राण वाचले आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

छत्तीसगडमधील पाचजण नेपाळमध्ये फिरायला गेले होते. सकाळी ते एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबले. त्यावेळी तिथे त्यांना अचानक आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेल्याची माहिकी मिळाली. जर ते १० – १५ मिनिटे आधी गेले असते तर ते पुरातच अडकले असते. परंतु एका चहाच्या ब्रेकमुळे त्यांचा जीव वाचला. त्यावेळी या सर्वांनी एका उंच ठिकाणी रात्र घालवली. परिस्थिती पूर्वरत झाल्यावर ते सुखरूप मूळ गावी परतले, तेव्हा त्यांनी हा सर्व थरार सांगितला.

Maharashtra TimesNepal Flood : माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, त्याला सोडून एकटी कशी जगू? महाप्रलयाचे इशारे, नेपाळी महिलेचा घराबाहेर पडण्यास इन्कार
नारायण सेन, दिनेश ओझा, प्रेम सिंह जगत, यतेंद्र प्रकाश और दिनेश सिंह ठाकुर हे ५ मित्र छत्तीसगडच्या रायपूर येथील ‘माना कॅम्प’ भागातील रहिवासी आहे. या सर्वांचे वय ५० ते ६० वर्ष आहे. रायपूर येथून २१ ऑगस्टला आपल्या प्रवासाला सुरुवात केली. ते पशुपतिनाथ मंदिर, मनोकामना मंदिर सह अनेक पर्यटन स्थळांवर जाणार होते. बुधवारी २६ ऑगस्टला हे ५ मित्र चहा पिण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते धाडींग जिल्ह्यातील मलेखु कसबे येथेल एका हॉटेलमध्ये थांबले. त्यांनी चहासाठी घेतलेला ब्रेक त्यांच्यासाठी जीवदान ठरला आणि ५ मित्रांचा जीव वाचला.

सांगितला दोन रात्रींचा थरार

५३ वर्षीय नारायण सेन म्हणाले, “२६ ऑगस्टला जेव्हा अचानक पूर आला तेव्हा आम्ही चहासाठी थांबलो होतो, हे आमचे नशीबच, जर आम्ही १०-१५ मिनिटे आधी निघालो असतो तर कदाचित आम्ही त्यात अडकलो असतो. जिथे आम्ही चहासाठी थांबलो ते हॉटेल एका भारतीयाचे होते. त्यांनीही आम्हाला खूप मदत केली आणि जेवणही दिले.”

Maharashtra TimesNepal Flood Help: नेपाळला नक्की मदत हवी की नको? मदत नको म्हणाल्यानंतर घेतला यू टर्न आता परराष्ट्र मंत्र्यांचे नवीनच विधान

दिनेश सिंह ठाकुर (५५ वर्ष) यांनी सांगितले की, जेव्हा पूर आला तेव्हा ते आणि त्यांचे मित्र पशुपतिनाथ मंदिरापासून फक्त ५० किमी दूर होते. हॉटेलमध्ये आम्ही चहा पीत असतानाच आम्हाला पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळाली. नदीकाठची गावे, इमारती, कार्यालये आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचे ऐकायला मिळाले. नक्की काय झाले हे पाहण्यासाठी आम्ही त्रिशूळ नदीकाठी पोहोचलो. तेव्हा आम्ही जे पहिले त्याचे शब्दात सांगणे कठीण आहे.

दिनेश ओझने सांगितले की, या पुरानंतरची दृश्ये आयुष्यभरात आठवणीत राहणार. अनेक लोक आपल्या कुटुंबीयांच्या शोधात इकडे तिकडे भटकत होतीत. आम्ही कारमध्ये झोपण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा पूर येणार या भीतीमुळे आम्हाला झोप लागलीच नाही. आम्ही अखेर सुखरूप घरी पोहोचलो याचा आम्हाला आनंद आहे.

इंटरनेटच्या मदतीने संपर्कांत

पुराचे रौद्ररूप पाहून त्यांनी उंच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. भाड्याने घेतलेल्या कारमध्ये रात्र काढली. तिथे वीज आणि पाणी नव्हते, मात्र स्थानिक लोकांनी आणि प्रशासनाने त्यांना मदत केली. हे सगळे इंटरनेटच्या मदतीने आपल्या कुटुंबाशी संपर्कात होते. भारतीय सरकारच्या हेल्पलाइनवर त्यांनी आपले लोकेशन पाठवले होते. २८ ऑगस्टला ते रायपूरला परत येण्यासाठी निघाले आणि सुखरूप घरी पोहोचले.

तैनात महिला सुरक्षा रक्षकांनी बांधली राखी

हे पाच मित्र नेपाळ येथून राखी पौर्णिमेनंतर परतणार होते. त्यामुळे त्यांच्या बहिणींनी सर्वांना आधीच राख्या दिल्या होत्या. या राख्या तिथे तैनात असलेल्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर बांधल्या. हा क्षण त्यांच्यासाठी सगळ्यात भावुक करणारा होता.

मृतांचा आकडा वाढला

बुधवारी भोटेकोशी आणि त्रिशूली नदीला अचानक आलेल्या महापुराने अनेकांचा मृत्यू झाला. या महापुरात आतापर्यंत ७३४ शव सापडलेले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. युद्धपातळीवर बचाव पथक बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत. २ हजारांपेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. तिबेटमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नेपाळमध्ये बेपत्ता नागिकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे. यासोबतच चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत