Headlines

कार्ल बेनेडिक्ट फ्रे यांचा कॉलम:आपण केवळ उत्पन्नासाठीच कोणतेही काम करत नाही




‎‎‎‎‎‎‎‎‎‎कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) या‎कादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनी‎बहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्ण‎व्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते व‎व्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न व‎निवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातात‎कोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पना‎दूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)‎मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,‎असे आत्ताच निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र‎एआय मानवी जीवनाच्या अर्थासमोर गंभीर आव्हाने‎उभी करत आहे, हे निश्चित आहे. आपली बहुतांश कामे ‎‎ऑटोमॅट सरासरी आपण अधिक समृद्ध होऊ. परंतु‎यातून समाधानाची पातळीही वाढायला हवी. संशोधन ‎‎सांगते की तुमचे उत्पन्न दुप्पट झाले, तरी जीवनाचे ‎‎मूल्यमापन करण्याचे तुमचे निकषही तितकेच कठोर‎होतात. पण जीवनाला अर्थ असणे हा वेगळाच विषय‎आहे.‎ आपण काम करतो, त्यातून आपल्याला केवळ उत्पन्न ‎‎मिळत नाही; ते आपल्या ओळखीचाही एक भाग असते. ‎‎उलट हातात कोणतेही काम नसल्यास पूर्ण उत्पन्न‎मिळत असूनही त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत ‎‎परिणाम होतो. वेतनाबरोबरच काम व्यक्तीला शिस्त,‎आपलेपणाची भावना, सामाजिक प्रतिष्ठा आणि‎एखाद्या उद्दिष्टात योगदान दिल्याचे समाधान देते. या‎गोष्टींचे पुनर्वाटप पैशांप्रमाणे करता येत नाही. प्रत्यक्षात‎एआय किमान तीन प्रकारे जीवनाच्या अर्थाला आव्हान‎देत आहे. तुमच्या उद्देशभावनेला कमकुवत करण्यासाठी‎एआयने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची गरज नाही; ते‎केवळ कार्यक्षम, पुरेसे चांगले आणि कमी खर्चिक‎असले तरी पुरेसे आहे.‎ एखाद्या असामान्य व्यक्तीकडून मागे पडणे वेगळे; पण‎केवळ ‘पुरेसे चांगले’ असलेल्या तंत्रज्ञानामुळे‎अप्रासंगिक ठरणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.‎याशिवाय, एआयवर आधारित मनोरंजन आणि‎‘सहवास’ (एआयलाच मित्र समजून त्याच्यासोबत वेळ‎घालवणे) लोकांच्या वेळेचा आणि सामाजिक‎संबंधांच्या गरजेचा मोठा भाग व्यापू शकतो. जीवनाला‎अर्थ देणाऱ्या अधिक आव्हानात्मक अनुभवांची जागा तो‎घेऊ शकतो. सहज, अखंड जवळीक देऊन एआय‎प्रयत्न, कर्तव्य, परस्परता, निःस्वार्थपणा आणि‎असुविधा यांना मागे टाकू शकतो, जे खऱ्या नात्यांसाठी‎आवश्यक असतात. एआयशी असलेल्या नात्यात‎आपल्याकडून बदल्यात काहीच अपेक्षित नसते.‎प्रत्यक्षात ते नाते नसून उपभोगाचा एक प्रकार असतो.‎डिजिटल जीवनाने आधीच मानवी संबंध बदलले‎आहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापर‎जीवनातील समाधान कमी होण्याशी संबंधित असल्याचे‎दिसून आले आहे.‎ यात अद्याप एआयची भूमिका नाही, पण यावरून एवढे‎स्पष्ट होते की डिजिटल माध्यमांमधील अधिक संपर्क‎म्हणजे मानवी नात्यांमध्ये अधिक खोली असे नाही. खरे‎तर, जीवनाचा अर्थ क्वचितच आरामाच्या परिस्थितीत‎सापडतो. तो एखादे निवडलेले ध्येय गाठण्यासाठी‎केलेल्या प्रयत्नांतूनच मिळतो. मग ते स्वतःच्या मुलांचे‎संगोपन असो किंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्य‎मिळवणे असो. आयुष्याकडे मागे वळून पाहताना लोक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎एखाद्या अर्थपूर्ण ध्येयासाठी केलेल्या संघर्षालाच‎अधिक मौल्यवान मानतात. कदाचित म्हणूनच अधिक‎समृद्ध आणि विकसित समाज अधिक सुविधा‎अनुभवतात; पण जीवनाच्या उद्देशाची अधिक सखोल‎जाणीव त्यांना होत नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की,‎एआय मानवी क्षमतांपेक्षा पुढे गेला तरी प्रत्येक प्रकारचे‎काम संपणार नाही. संगणक बुद्धिबळात माणसांपेक्षा‎श्रेष्ठ ठरले, तरी लोकांनी बुद्धिबळ खेळणे सोडलेले‎नाही. आजही लोक धावतात, स्वयंपाक करतात, संगीत‎रचतात, फर्निचर तयार करतात आणि प्रत्यक्ष‎सादरीकरणे पाहण्यासाठी महागडी तिकिटे विकत घेतात.‎ (प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ जीवनात अर्थाचा शोध क्वचितच‎सुखसोयींच्या कुशीत लागतो. तो एखादे‎ध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनच‎सापडतो. मग ते मुलांचे संगोपन असो‎किंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्य‎मिळवणे असो. माणूस शेवटी एखाद्या‎अर्थपूर्ण उद्दिष्टासाठी केलेल्या‎संघर्षालाच सर्वाधिक मौल्यवान मानतो.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत