Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:भक्ती करत राहा; ईश्वराला‎ प्रार्थना आवडते, प्रदर्शन नाही




कबीर शेवटच्या काळात कुठे गेले, हे रहस्य फुलांमध्येच दडून राहिले.‎मीराबाई कुठे अंतर्धान पावल्या, हे कोणतीही मूर्ती सांगू शकत नाही.‎भक्त ईश्वरात कसा विलीन होतो, याची अनेक उदाहरणे आपल्या‎परंपरेत आहेत. भक्तीसाठी तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे हे पहिले पाऊल ठरू‎शकतात. त्यानंतरचा मार्ग मात्र तुमचा स्वतःचा असतो. आयुष्यभर‎तुम्ही कोणत्याही मंदिरात गेला नाहीत. तरीही भक्ती परिपक्व होऊ‎शकते. आताची नवी पिढी भक्ती वेगळ्या पद्धतीने करताना दिसेल.‎गेल्या 50 वर्षांत अमेरिकेत चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या 20 ‎टक्क्यांनी घटली. याउलट भारतात जुन्या मंदिरांना नवे स्वरूप दिले‎जात आहे. भव्य कॉरिडॉर होत आहेत. त्यात सोहळ्याची भव्यता व‎भक्तांची गर्दी अधिक ठळकपणे दिसते. परंतु भक्ती शोधून सापडत‎नाही. मंदिरे जपली जात आहेत. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. मात्र‎ती केवळ पर्यटन, मनोरंजन किंवा निवडणुकीच्या राजकारणाची केंद्रे‎बनू नयेत. कबीर व मीराबाई यांनी शिकवले आहे -ईश्वराला प्रार्थना प्रिय‎असते; प्रदर्शन नव्हे. ‎‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत