Headlines

ओमराजे निर्णायक वळणावर, कार्यकर्ते दिशा ठरवणार, गोवर्धनवाडीत चर्चा सुरू




ठाकरेंकडे कायम राहावं की शिंदेसेनेत जावं याबाबत खासदार ओमराजे निर्णय घेणार आहेत. धाराशिवमधील कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून ओमराजे निर्णय घेणार आहेत. ओमराजेंनी सत्तेत जावं, तेव्हाच विकास होईल, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विरोधात राहून विकास काम करता येणार नाही, असंही कार्यकर्ते म्हणतायत. ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडू अशी साद राज्यभरातील समर्थकांकडून घालण्यात येतेय. त्यामुळे ओमराजे नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत