![]()
चमकदार क्रेडिट कार्ड व किमान सरासरी शिल्लक रकमेचा नियम बँक इंडस्ट्रीसाठी कमाईचा मोठा आहे. प्रीमियम कार्ड एअरपोर्ट लाउंजपर्यंत पोहोच, कॅशबॅक व रिवॉर्ड पॉइंट्सचे आमिष दाखवतात. दुसरीकडे, जर बचत खात्यात किमान शिल्लक नसेल, तर बँक दंड आकारते. आपण सुविधांच्या मागे धावतो व बँका वार्षिक शुल्क, व्याज, दंड व सर्व्हिस चार्जमधून कमाई करतात. अर्थ मंत्रालयानुसार, गेल्या 5 आर्थिक वर्षांत बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून 27,973 कोटी रुपयांचा मोठा दंड वसूल केला. एचडीएफसीला या वसुलीतून 5,670 कोटींची कमाई झाली. ॲक्सिस आणि बँक ऑफ बडोदासाठी हा आकडा अनुक्रमे 3,787 कोटी आणि 2,028 कोटी राहिला. सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्स साइन-अप बोनस आणि कार्ड्सचा प्रचार करून असे वातावरण तयार करतात, जणू काही ही कार्ड्स तुम्हाला त्यांच्यासारखीच एक शानदार आणि हाय-फाय लाइफस्टाइल देतील. ते कार्डवरील खर्चाची मर्यादा पूर्ण करण्यासाठी ॲडव्हान्स इन्शुरन्स भरणे, जिम मेंबरशिप घेणे किंवा गाडी दुरुस्त करणे यासारखे सल्ले देतात. पण या सर्वांसाठीही खिशातून खरी रोकडच जाते. ट्रॅव्हल पर्क्स म्हणजेच प्रवासात सवलत देणारी क्रेडिट कार्ड्स बँका व एअरलाइन्ससाठी फायदेशीर असतात, पण मध्यमवर्गासाठी त्याचा विशेष फायदा होत नाही. कारण हा वर्ग दर आठवड्यास विमान प्रवास करत नाही. एकही आठवडा असा जात नाही जेव्हा आपल्यासारख्या लोकांना आकर्षक क्रेडिट कार्डचे आमिष दाखवले जात नाही. मॉल किंवा एखाद्या दुकानाच्या कॅश काउंटरवर लोक अनेकदा अनेक क्रेडिट कार्ड््स दाखवत म्हणतात, ‘हे चालले नाही, तर हे घ्या.’ विडंबना ही की कॅशिअरसमोर स्वतःला जितके श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच शांतपणे आपल्या खिशातून पैसा बाहेर जातो. संपत्ती क्वचितच प्रीमियम कार्ड जमा केल्याने किंवा टाळता येण्याजोगे शुल्क भरल्याने बनते. ती अनावश्यक शुल्क आणि खर्चापासून वाचून आणि समजूतदारपणे कर्ज घेतल्याने बनते. चमकदार ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड अनेकदा आपल्यासोबत मोठे ओझे घेऊन येतात. मॅनेजमेंट टिप : खरी धनसंपत्ती हे प्रीमियम कार्ड््सना जमा केल्याने बनत नाही तर फालतूचे शुल्क, दंड आणि विनाकारण होणाऱ्या खर्चापासून वाचल्याने बनते. पैशांचा वापर स्वतःसाठी करा, बँकांचा फायदा करून देण्यासाठी नाही.
Source link
एन. रघुरामन यांचा कॉलम:श्रीमंत दिसणे सोपे, पण बनणे कठीण
