६ फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत. तसेच चुकीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचे सांगत मतदारांची माफी मागत आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरेंना खोचक सल्ला दिलाय. उद्धव ठाकरेंचा पक्ष आता झिरो, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं राणेंनी म्हटलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संजय दिना पाटलांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावरूनही राणेंनी टोला लगावला.