Neeraj Chopra News : भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा आशियाई स्पर्धेतून बाहेर झाला आहे. नीरज म्हणजे भारताचं पदक फिक्स अस समीकरण गेल्या काही स्पर्धांमध्ये दिसलं नाही. पण नेमकं काय कारण आहे की नीरज बाहेर पडला, जाणून घ्या.

उर्वरित मोसमावरच पाणी, याचा अर्थ ५ सप्टेंबरला ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम टण्यातही नीरज भाग घेऊ शकणार नाही. या स्पर्धेच्या लुसान टप्प्यानंतर नीरजने डायमंड लोग फायनलची पात्रता मिळवली होती. गेल्याच आठवड्यात डायमंड लीग मालिकेतील लुसान स्पर्धेत नीरजने मोसमातील सर्वोत्तम भालाफेक केली होती. त्या स्पर्धेच्यावेळी ही दुखापत न झाल्याचे नीरजने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले.
Asia Cup 2026 : आशिया कपमध्ये भारत वि. थायलंड आज पहिला सामना; किती वाजता आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या‘कठोर परिश्रम घेतल्यानंतर अखेर लय गवसत होती. लुसानमध्ये मोसमातील सर्वोत्तम कामगिरीही झाली, ज्याची मी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होतो. दुर्दैवाने काही वेळात सरावादरम्यानच माझ्या त्रोट्धाला दुखापत झाली. माझे डॉक्टर, सहायक वर्गातील सदस्य यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुखापतीची गंभीरता बघून उर्वरित मोसमात न खेळण्याचा निर्णय झाला’, असे नीरजने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Imran Khan Pakistan : दाऊदचा व्याही कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला! इम्रान खान यांची अवस्था पाहून अश्रू अनावर, पाकिस्तान सरकारकडे काय केली मागणी?
लय गवसत आहे, असे वाटत असतानाच दुखापतीचा पुन्हा खो बसल्याने, २८ वर्षीय नीरज निराश आहे. मात्र सध्या पूर्णपणे फिट होणे, हे मुख्य लक्ष्य असल्याचेही नीरजने सांगितले. ‘आता माझे लक्ष पूर्णपणे फिट होण्यावर आणि आधीपेक्षाही अधिक कणखर होऊन पुनरागमन करण्यावर आहे’, असा विश्वासही नीरजने व्यक्त केला.
Anaya Bangar : अनाया बांगर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला भिडली, परवानगी नाकारण्याच्या मागणीला दिलं सडेतोड उत्तर, स्पष्टच बोलली…
‘चढउतार है जीवनाचा भाग असतात. मीदेखील ही परिस्थिती स्वीकारत पुढे वाटचाल सुरू केली आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार’, असेही नीरजने सांगितले. नीरजच्या अनुपस्थितीत रोहित यादव याच्याकडून पदकाची अपेक्षा असेल. तसेच नीरजाऐवजी बदली भालाफेकपटूचा विचारही सुरू आहे. राष्ट्रकुल ब्राँझपदक विजेत्या यशवीर सिंग याला संधी मिळू शकते.
लक्षवेधक
- नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, त्यामुळे त्याचे एशियाडला मुकणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे
- टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या नीरजकडून यंदा साजेशी कामगिरी होत नव्हती
- मात्र लुसानमधील चमकदार कामगिरीने सूर आणि लय पुन्हा मिळत असल्याचे संकेत नीरजकडून मिळत होते
दृष्टिक्षेप
- नीरज चोप्रा म्हणजे भारताच्या पदकाची हमखास खात्रीच
- गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये नीरज वरच्या क्रमांकावर
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजने पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले होते
- २०२३मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला

