Headlines

आयर्लंडमधल्या जखमा अजून ताज्या, इंग्लंडमध्ये श्रेयसचा ‘तो’ निर्णय अनपेक्षित, माजी क्रिकेटर काय म्हणाला?


Dinesh Kartik On Shreyas Iyer : भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजीची निवड केल्याने चर्चा रंगली आहे. दिनेश कार्तिकच्या मते, आयर्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक पराभवाचा परिणाम या निर्णयामागे असू शकतो. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावरील दबाव आणि त्याच्या दमदार अर्धशतकावरही कार्तिकने भाष्य केले आहे.

dinesh karthik links shreyas iyers toss decision to ire
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असतानाही त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. साधारणपणे अशा परिस्थितीत संघ आधी गोलंदाजीच निवडतात. मग श्रेयसने हा निर्णय का घेतला? यावर माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने मोठं विधान केलं आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १८९ धावा केल्या. मात्र, त्यानंतर पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरूच होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. पण श्रेयसच्या निर्णयाची चर्चा कायम राहिली.

आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचा परिणाम?

कार्तिकच्या मते, या निर्णयामागे आयर्लंड दौऱ्यातील पराभवाचा परिणाम असू शकतो. त्या मालिकेत भारताला दोनही सामने गमवावे लागले होते. त्यामुळे पुन्हा धावांचा पाठलाग करताना दबाव येऊ नये, म्हणून भारताने आधी फलंदाजी करण्याचा पर्याय निवडला असावा. क्रिकबझवर बोलताना कार्तिक म्हणाला, “अशा हवामानात बहुतांश संघ आधी गोलंदाजी करतात. पण भारताने वेगळा निर्णय घेतला. मला वाटतं, आयर्लंड दौऱ्याचा परिणाम अजूनही संघाच्या मनात होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला.”

सुरुवातीला धक्के, मग श्रेयस-अभिषेकची भागीदारी

भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन एका धावेवर, तर ईशान किशन शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. अभिषेकने २४ चेंडूत ५९ धावांची आक्रमक खेळी केली. श्रेयसनेही जबाबदारीने फलंदाजी करत ४७ चेंडूत ६८ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वाची भागीदारी केली.

Maharashtra TimesRavi Shastri : आयर्लंडविरुद्ध नाही, इंग्लंडविरुद्धही नाहीच; वैभवच्या पदार्पणाबाबत तारीख पे तारीख, माजी कोच रवी शास्त्री भारतीयांच्या मनातलं थेट बोलले

श्रेयसवर होता दबाव

आयर्लंड दौरा श्रेयससाठी अत्यंत खराब ठरला होता. दोन सामन्यांत त्याच्या बॅटमधून अवघ्या १३ धावा आल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची खेळी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती. याबाबत कार्तिक म्हणाला, “कर्णधार म्हणून श्रेयसवर दबाव होता. अशावेळी स्वतः धावा करून संघाला पुढे नेणं गरजेचं असतं. त्याने तेच केलं. ‘मी कर्णधार आहे आणि मी संघासाठी धावा करेन,’ हा संदेश त्याने आपल्या खेळातून दिला. त्यामुळे ही खेळी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली.”

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा