Suryakumar Yadav Post : भारताला आपल्या कॅप्टन्सीमध्ये वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या एका पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर आलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका २-० ने गमावल्यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर भारताकडून नेहमी सहज पराभूत केलेल्या आयर्लंडकडून झालेला हा पराभव अधिकच चर्चेत आला. अशा वातावरणात भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने सोशल मीडियावर केलेल्या एका भावनिक पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं. २९ जून या खास दिवसाची आठवण काढत त्याने विश्वचषक विजयाचे क्षण पुन्हा एकदा शेअर केले. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने यंदा टी-२० विश्वचषक २०२६ जिंकत इतिहास रचला होता. अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आणि अशी कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला. मात्र २९ जून हा दिवस सूर्यकुमारसाठी आणखी खास आहे. कारण याच दिवशी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या अंतिम सामन्यात सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा घेतलेला अप्रतिम कॅच आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
काय आहे सूर्याच्या पोस्टमध्ये?
याच आठवणींना सूर्याने उजाळा दिला आहे. त्याने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, “खेळात काही क्षण असे असतात, जे आयुष्यभर सोबत राहतात. प्रत्येक त्याग, प्रत्येक वेदना, प्रत्येक सराव, प्रेक्षकांचा प्रत्येक जल्लोष… हे सगळं मिळून एका अविस्मरणीय रात्रीत बदललं. या क्षणांचा भाग होता आलं, याचा अभिमान आहे. जगभरातील लाखो भारतीयांसोबत हा आनंद अनुभवता आला, हे माझं भाग्य आहे. अंतिम सामन्यापूर्वी, सामन्यादरम्यान आणि त्यानंतर दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचे आभार. २९ जून २०२४ हा दिवस आपण कायम साजरा करू.”
दरम्यान, सूर्याच्या या पोस्टवर चाहत्यांचा तुफान प्रतिसाद पाहायाला मिळत आहे. सूर्याकडून कॅप्टन्सी काढून घेतल्यावर चाहते नाराज झाले होते. त्यांनी सूर्याने जखमेवर मीठ चोळलं असं कमेंटमध्ये लिहिलं. अनेकांनी समजणाऱ्यांना समजलं, अशाही प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी सूर्या टॉस हारतो मॅच जिंकतो, असं त्यांच्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. सूर्याच्या या पोस्टला इन्स्टा आणि फेसबुकवर मिळून दीड मिलियनच्या वर लाइक्स मिळाले आहेत.
दरम्यान. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये दुसरं विजेतेपद मिळालं होतं. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २०२६ मध्ये पुन्हा जेतेपद पटकावत सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम केला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा