Headlines

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होणार, एक गोष्ट ठरेल कारणीभूत’; हरभजन सिंग असं का म्हणाला?


Harbhajan Singh News : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केलेले विधान चर्चेत आले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरू शकते, असं भज्जीचं म्हणणं आहे. नेमकं काय ते जाणून घ्या.

Harbhajan Singh
Harbhajan Singh(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘जगभरातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या आयपीएलसारख्या लीगची लोकप्रियता सातत्याने वाढल्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होण्याची शक्यता आहे,’ अशी खंत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने व्यक्त केली.

वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टवरील मुलाखतीत हरभजनने आपली मते व्यक्त केली. टी-२० लीगचे वाढते आयोजन पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या भवितव्याबाबत त्याने मोकळेपणाने मत मांडले. व्यावसायिक लीगचा प्रेक्षकवर्ग वाढत असला, तरी या स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लोकप्रियतेवर मात करतील का, या प्रश्नावर हरभजन म्हणाला, ‘करतील का? हे घडले आहे. सुमारे ७० टक्के लोक आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी व्यावसायिक लीग पाहत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांना पुरेशा संख्येने प्रेक्षक मिळतात. मात्र, भारत-श्रीलंका किंवा भारत-अफगाणिस्तान सामन्यांना अल्प प्रतिसाद मिळतो.’ ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील लढतींनाही चांगली प्रेक्षकसंख्या मिळते, असे हरभजनसिंगचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesIND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज; जाणून घ्या
इंग्लंडमधील ‘दी हंड्रेड’ असो किंवा ऑस्ट्रेलियातील ‘बीबीएल’ या व्यावसायिक लीगसाठी स्टेडियम हाउसफुल्ल होतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मात्र मागे पडले असल्याचं हरभजनसिंगने म्हटलं आहे. एकंदरित त्याच्या म्हणण्यानुसार लीगमुळेच आंतरराष्ट्रीय मालिकांच्या प्रेक्षक क्षमतेवर परिणाम होत चालला आहे. कारण चाहते आता ज्या संख्येने आयपीएल आणि इतर लीगच्या सामन्यांना हजेरी लावत आहेत त्यातुलनेत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसत नाही. याचा पार्श्वभूमीवर बोलताना हरभजन सिंगने हे विधान केले आहे.

कसोटी क्रिकेटबाबत हरभजनची मते

कसोटी क्रिकेट म्हणजे कौशल्य आणि जिद्दीची खरी परीक्षा आहे. क्रिकेटचा हा प्रकार कायमच सर्वोच्च स्थानी असायला हवा. कसोटी हेच खरे क्रिकेट, त्याला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं हसभजन म्हणाला. कारण कसोटी क्रिकेट पाच दिवसांचे असल्याने प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत. कारण झटपट क्रिकेट म्हणजे टी-२० सामने आणि लीगचा फॉरमॅटही तसाच काहीसा आहे. द हंड्रेड, आयपीएल, बीबीएलमुळे चाहत्यांना आता कसोटी क्रिकेट रटाळ वाटू लागले आहे.

Maharashtra TimesShreyanka Patil : टीम इंडियाची स्टार खेळाडू श्रेयंका पाटीलचा ‘बबली बदमाश’ गाण्यावरचा Video तुफान व्हायरल
टी-२० लीग मोठ्या झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जुनी प्रतिष्ठा परत मिळवणे कठीण झाले आहे. या लीगमुळे फलंदाजांची मानसिकता आणि प्रेक्षकांची विचारसरणी बदलली आहे. वेळेची कमतरता असल्याने टी-२० क्रिकेट अधिक लोकप्रिय होत असल्याचं हरभजसिंग याने सांगितलं.

Maharashtra TimesRohit Sharma : रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?
दरम्यान, आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये तो उत्साह राहण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू केली आहे. दोन वर्षांनी या विजेतेपदासाठी दोन संघ खेळतात. अंतिम सामन्यासाठी ज्या मालिका होतात त्यांच्या गुणांवर पॉइंट टेबलमध्ये चढाओढ दिसते. किमान त्यामुळे खेळाडू संपूर्ण ताकदीने मैदनात प्रदर्शन करतात.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा