![]()
ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्नर यांनी स्वित्झर्लंडमधील अमेरिका-इराण चर्चेची माहिती लीक करून मोठा नफा कमावला आहे. इराणचा आरोप आहे की कुश्नर आणि ट्रम्प यांचे विशेष दूत, स्टीव्ह विटकॉफ यांनी चर्चेतील गोपनीय माहितीचा वापर करून बाजारात फेरफार केला, ज्यामुळे त्यांना ८६,००० कोटी रुपयांचा नफा झाला.इराणने या नफ्यापैकी अर्ध्या भागाची (४३,००० कोटी रुपये) मागणी केली आहे. इराणचा दावा आहे की, चर्चेदरम्यान त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांना खासगी संदेशातून याची पूर्वसूचना दिली होती. ही माहिती गुरुवारी उघड झाली. इराणचा आरोप आहे की, चर्चेदरम्यान कुश्नर व विटकॉफ हे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू व मोसाद प्रमुखांशीरोज बोलत होते, ज्यामुळे माहिती इस्रायलपर्यंत पोहोचली. युद्ध तीव्र… कर्करोग रुग्णालयाजवळ हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. इराणने म्हटले, लाल समुद्र बंद करू इराणसोबतचे युद्ध वाढत आहे. गुरुवारी अमेरिकेने इराणच्या अनेक भागांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेने अहवाज शहरातही हल्ले केले. मुलांच्या कर्करोग रुग्णालयाजवळ झालेल्या हल्ल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. २११ रुग्णांना तातडीने बाहेर काढावे लागले.रुग्णालयाजवळील हल्ल्याला अमानुष संबोधत इराणने इशारा दिला की, जर हे हल्ले थांबले नाहीत आणि अमेरिकेने त्यांच्या वीज वितरण जाळ्याला लक्ष्य केले, तर ते लाल समुद्रातील महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करतील. इराणने येमेनच्या हुथी बंडखोरांना तयार राहण्यास सांगितले आहे.
Source link
अमेरिका-इराण युद्ध:चर्चा लीक करत ट्रम्पच्या जावयाने बाजारातून कमावले 86 हजार कोटी; इराण म्हणाला, निम्मा हिस्सा द्या
