Headlines

अभिनेता राजपाल यादवच्या मालमत्तेचा होणार लिलाव, लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता मित्राच्या या घरात राहत होता – rajpal yadav property to be auctioned actor once lived in friend house get home decor ideas for small house


Rajpal Yadav Bank Loan Property Auction: अभिनेता राजपाल यादव यांच्या शहाजहानपूर येथील दोन मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १६.६१ कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, संघर्षाच्या काळात राजपाल यादव काही काळ मुंबईत मित्राच्या घरी राहत असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता.

Rajpal Yadav Property Auction News
फोटो सौजन्य :- @Farah Khan, @rajpalofficial
Rajpal Yadav Bank Loan Property Auction: आपल्या भन्नाट विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथील त्यांच्या दोन मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणींमुळे आणि बँकेचे मोठे कर्ज थकीत राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, राजपाल यादव यांच्यावर बँकेचे सुमारे १६.६१ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथील त्यांच्या दोन मालमत्तांवर लिलावाची नोटीस लावण्यात आली आहे. या मालमत्तांची अंदाजे किंमत ३.१९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बँकेने कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत ही कारवाई सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र,राजपाल यादव यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत संघर्ष केला होता. इतकेच नव्हे तर मुंबईत स्थिर होण्यासाठी ते काही काळ मित्राच्या घरी राहिले होते, असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.(फोटो सौजन्य :- @Farah Khan, @rajpalofficial)

असं होतं राजपाल यादवच्या मित्राचं छोटंसं घर

असं होतं राजपाल यादवच्या मित्राचं छोटंसं घर

फराह खानने चार महिन्यांपूर्वी तिच्या सोशल मीडिया चॅनेलवर राजपाल यादव यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राजपाल यादव यांनी सांगितले की, ते आजही त्यांच्या मित्राच्या छोट्याशा घरात राहतात. संघर्षाच्या काळात ज्या घराने त्यांना आधार दिला, तेच घर त्यांनी आजही सोडलेले नाही. साधेपणा जपत आणि जुन्या आठवणींशी नाळ जोडून ठेवत ते त्या घरात राहणे पसंत करतात, असेही त्यांनी या संवादात सांगितले.

छोट्या घराची सजावट कशी करावी

छोट्या घराची सजावट कशी करावी

छोट्या घराची सजावट करताना जागेचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे असते. कमी जागेतही घर सुंदर आणि प्रशस्त दिसण्यासाठी साधे पण आकर्षक फर्निचर, हलके रंग आणि नीटनेटकी मांडणी वापरता येते. स्टोरेज असलेले सोफे, भिंतीवरील शेल्फ, सुंदर टीव्ही युनिट आणि लाकडी फर्निचरमुळे घराला उबदार व क्लासिक लुक मिळतो. आरसे, इनडोअर प्लांट्स आणि योग्य प्रकाशयोजनेच्या मदतीने छोट्या जागेलाही आकर्षक बनवता येते. जास्त वस्तूंची गर्दी न करता काही निवडक सजावटीच्या वस्तू वापरल्यास घर साधे, सुंदर आणि आरामदायी दिसते.

सोफाने पूर्ण केला लुक

सोफाने पूर्ण केला लुक

घरातील आरामदायी सोफ्यामुळे या छोट्याशा घराचा लुक पूर्ण होतो. साध्या डिझाइनचा सोफा घराच्या सजावटीशी सुंदर जुळून येतो आणि बसण्याच्या जागेला अधिक आकर्षक व आरामदायी बनवतो. लाकडी फर्निचर, सुंदर टीव्ही युनिट आणि सोफ्याच्या मांडणीमुळे घराला साधेपणातही एक खास लूक मिळतो.

राजपाल यादव मित्राचे घर

छोटंसं घर घरातील जुन्या पद्धतीचे लाकडी कपाट

छोटंसं घर घरातील जुन्या पद्धतीचे लाकडी कपाट

लाकडाचे फर्निचर आणि साधी सजावट असलेले हे छोटंसं घर घरातील जुन्या पद्धतीचे लाकडी कपाट, खुर्च्या आणि फर्निचरमधून साधेपणा व आपलेपणाची झलक पाहायला मिळते. यासोबतच सुंदर डिझाइनचे टीव्ही युनिट घराच्या सजावटीला आकर्षक लूक देते. छोट्या जागेतही नीटनेटकी मांडणी, उबदार रंगसंगती आणि पारंपरिक लाकडी फर्निचरमुळे घराला एक वेगळाच क्लासिक टच मिळतो. भिंतींवरील साधी सजावट, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिसणारी स्वच्छता यामुळे हे घर साधेपणातही खास वाटते. आधुनिकतेपेक्षा साधेपणाला महत्त्व देणाऱ्या या घरात जुन्या आठवणी आणि आपुलकीची भावना जाणवते.

छोटं किचन

छोटं किचन

घरातील छोटंसं किचनही अतिशय साध्या आणि नीटनेटक्या पद्धतीने सजवलेले दिसते. मर्यादित जागेचा योग्य वापर करत कपाटे, स्टोरेज आणि आवश्यक वस्तूंची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. साधेपणा, स्वच्छता आणि व्यवस्थित नियोजनामुळे हे छोटंसं किचनही आकर्षक आणि आरामदायी वाटते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा