Headlines

अटल सेतू ते मुंबई-पुणे महामार्ग ‘सिग्नल फ्री’ प्रवास! नव्या उन्नत कनेक्टरमुळे टेन्शन मिटणार; मार्गाची डेडलाइन समोर| Maharashtra Times


Mumbai-Pune Expressway: दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून आता द्रुतगती महमार्गावर पोहोचणे शक्य होणार आहे. या कनेक्टरमुळे मुंबई ते पुणे अंतर 90 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे.

atal setu to expressway connector
नवी मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि अटल सेतूदरम्यान कनेक्टर तयार करण्यात येत आहे. या कनकेक्टरच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( MMRDA ) या प्रकल्पावर काम सुरू आहे. महत्त्वाच्या टप्प्यांवरील कामं प्रगतीपथावर सुरू आहेत. एमएमआरडीए या कनेक्टरचं काम फेब्रुवारी 2027पर्यंत पूर्ण करणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून पुणे-मुंबई महामार्गावर पोहोचणे अगदी सोपे होणार आहे.

176 पैकी 143 ठिकाणी बांधकामाचा पाया रचला केला आहे. यापैकी 141 ठिकाणी पियर बांधण्यात आले आहेत. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून 830 पैकी 653 गर्डरसुद्धा उभारण्यात आले आहेत. याशिवाय इतर ठिकाणी कामं सुद्धा सुरू आहेत. पनवेल येथील पळस्पेतील सर्व्हिस मार्गांवर रुंदीकरणाचं काम सुरू आहे. ही सर्व कामं पूर्ण होताच अटल सेतू ते मुंबई-पूणे महामार्गावर पोहोचणे सोपे होणार आहे.

Maharashtra TimesMumbai Water Metro: मुंबईतील वाहतूककोंडीवर ‘जलमेट्रो’चा उपाय! पहिल्या टप्प्यात 16 मार्ग व 26 टर्मिनल; नवी मुंबई, ठाण्यालाही जोडणार

कसा असेल मार्ग?

हा कनेक्टर 7.35 किमी लांब असणार आहे. सहा पदरी हाय-स्पीड कॉरिडोरच्या मदतीने मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक सुरळीत होणार आहे. नवी मुंबईतील पळस्पेपासून सुरू होणारा हा कनेक्टर पूणे-मुंबई द्रुतगती मार्गाला चिरले येथे जोडणार आहे. नुकतंच सुरू झालेलं नवी मुंबई विमानतळ चिरले जवळ स्थित आहे. त्यामुळे या कनेक्टरने विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. इतकच नाही तर, चिरले आणि पळस्पे येथील दोन उन्नत मार्गांना हा कनेक्टर जोडणार आहे. यामुळे जेएनपीटी महामार्गाशीही थेड जोडणी निर्माण होईल.

“या कनेक्टरमुळे मुंबईकरांना कोणत्याही सिग्नलशिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवेश करणे शक्य होईल. ज्यामुळे अटल सेतूद्वारे जलद आणि सहज प्रवासाचा कॉरिडोर तयार होईल. याचा मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना लक्षणीय फायदा होईल,” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले.

दोन टप्प्यांत बांधकाम होणार

हा कनेक्टर दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चिरले येथे 4.6 किमी लांब उन्नत मार्ग तयार होणार आहे. पुढील टप्प्यात पळस्पेपासून ते द्रुतगती महामार्गापर्यंत 2.75 किमी मार्ग तयार करण्यात येणार आहे. सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी वाहतूककोंडीमुळे 2 ते 2.5 तासांचा कालावधी लागतो. या कनेक्टरमुळे या प्रवास अवघ्या 90 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दररोज मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Maharashtra TimesMumbai Metro 5A : ठाणे-कल्याणवासियांचा प्रवास वेळ निम्म्यावर, मुंबई मेट्रो 5A ला मंजुरी, 34 किमी लांबीवर 19 स्टेशन्स, पाहा मार्ग

अटल सेतू कनेक्टरमुळे काय फायदे होणार?

  • सिग्नल फ्री प्रवास शक्य होणार
  • जंक्शनवरील वाहतूककोंडी फुटणार
  • दक्षिण मुंबई ते द्रुतगती महामार्ग प्रवास सुलभ होणार
  • वीकेंडला होणाऱ्या कोंडीतून मुक्तता
  • दररोज पुणे-मुंबई प्रवास सोपा होणार
सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा