मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळंही नेहमी चर्चेत असतो. दोन घटस्फोटानंतर अनुराग आता पुन्हा प्रेमात पडला असून तो सध्या २० वर्षानं लहान असलेल्या तरुणाला डेट करत आहे. सध्या ५३ वर्षांचा असलेला अनुराग कश्यप गेल्या २० वर्षानं लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीला डेट करत आहे.
त्यांच्यातील २० वर्षांहून अधिकच्या वयाच्या फरकामुळं त्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंग किंवा ट्रोलर्सच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागनं या वयाच्या फरकावरून होणाऱ्या ‘एज-शेमिंग’वर आणि स्वतःच्या मनात निर्माण झालेला संकोच यावर उघडपणं भाष्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुरागनं हे मान्य केलं की, लोकांपेक्षा तो स्वतः या वयाच्या फरकाबाबत खूप जास्त संवेदनशील आणि संकोचीत झाला होता. लोकांनी थेट शेमिंग करण्यापेक्षा मी स्वतःच खूप अवघडतो. एक वेळ अशी आली होती की मला माझा इतका संकोच वाटत होता की मी तिला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला.
शुभ्राच्या चेहऱ्यावर तिचे वय अजिबात दिसत नाही
जसं माझं वय वाढत चाललं होतं आणि ती तशीच दिसत होती, त्यामुळं माझ्या मनातील संकोच आणखी वाढला होता, असं अनुरागनं सांगितलं.
करिअर आणि वयाचा विचार करून दिला होता सल्ला
अनुरागनं असंही स्पष्ट केलं की, तो शुभ्राचं करिअर खराब करू इच्छित नव्हता आणि त्यांच्यातील वयाचा मोठा फरक पाहता तिनं संपूर्ण जग अनुभवल्यानंतरच हा निर्णय घ्यावा असं त्याला वाटत होतं. त्यामुळं त्यानं सुरुवातीला विचार करण्याची मोकळीक दिली होती. पण चित्रपट, पुस्तके आणि कौटुंबिक विचारांच्या आवडीमुळं त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं.
मुलाखतीदरम्यान शुभ्रानंही तिच्या पालकांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं. ती म्हणाली, जेव्हा २० वर्षांची मुलगी ४० हून अधिक वय असलेल्या, दोनदा लग्न झालेल्या व्यक्तीला डेट करते, तेव्हा कोणत्याही पालकांची प्रतिक्रिया साहजिक असते. पण माझ्या पालकांनी परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली. आज माझी आई आणि अनुराग खूप चांगले मित्र आहेत.
११ वर्षांचे यशस्वी नातं
गेल्या ११ वर्षांपासून एकत्र असणारे अनुराग आणि शुभ्रा आता मुंबई सोडल्यानंतर बंगळुरूमध्ये वास्तव्यास आहेत. सुरुवातीच्या काळात हे नाते मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, आता लोकांच्या टीकेची पर्वा न करता आपल्या आयुष्यात आनंदी असल्याचं अनुरागनं स्पष्ट केलं आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा