अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ जेवण उशिराने मिळाले या कारणावरून हॉटेल व्यावसायिकासोबत दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.या घटनेविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक एकवटले आहेत.आरोपींना मकोका लावून घटनेमागील आकावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.