Most Sixes T-20 Cricket, Rohit Sharma : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी चर्चेत असतो. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावकर केलेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक टी-२० षटकारांचा विक्रम आता मोडला आहे. हा विक्रम कोणी मोडला आहे, त्याने नेमका किती खेळ केला आहे, याबद्दल जाणून घेऊयात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचा ‘किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माला आता एका नवख्या नावाने मागे टाकले आहे. ऑस्ट्रियाचा कर्णधार करणबीर सिंगने हंगेरीविरुद्धच्या टी-20 सामन्यात अशी तुफानी खेळी केली की, रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडला. हंगेरीविरुद्ध 28 जून रोजी झालेल्या सामन्यात करणबीर सिंगने अवघ्या 57 चेंडूत 164 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार आणि तब्बल 12 षटकार ठोकले. या डावासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्याचा मानही त्याने पटकावला.
रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर गेला
टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने या प्रकारातून निवृत्ती घेतली होती. त्याच्या नावावर 205 षटकारांची नोंद आहे. मात्र करणबीर सिंगने आता 207 षटकारांसह त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, रोहितला हा टप्पा गाठण्यासाठी 159 टी-20 सामने खेळावे लागले. करणबीरने मात्र केवळ 60 सामन्यांतच हा पराक्रम करून दाखवला आहे.
करणबीर सिंगने 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 59 डावांत 48.71 च्या सरासरीने 2533 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 4 शतके आणि 20 अर्धशतकेही आहेत. आता सर्वाधिक षटकारांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार यादी
करणबीर सिंग (ऑस्ट्रिया) – 207
रोहित शर्मा (भारत) – 205
मुहम्मद वसीम (यूएई) – 196
सूर्यकुमार यादव (भारत) – 179
जोस बटलर (इंग्लंड) – 175
ऑस्ट्रियाची धावांची बरसात
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रियाने 20 षटकांत 7 बाद 322 धावांचा डोंगर उभारला. करणबीरच्या 164 धावांव्यतिरिक्त अबिदुल्लाह कोटवाने 26 चेंडूत 93 धावांची स्फोटक खेळी केली. या कामगिरीसह ऑस्ट्रियाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. या यादीत 2024 मध्ये गांबियाविरुद्ध झिम्बाब्वेने उभारलेल्या 344 धावा अजूनही अव्वल स्थानावर आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा