Headlines

हार्दिकसाठी KKR, CSKची MIसोबत बोलणी; पण पांड्याच्या मनात दुसरंच, अख्खा ट्रेड प्लॅनच लीक, एकाच अटीचा ख्वाडा!


Hardik Pandya Trade News : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान एका चॅम्पियन संघाने त्याला संघात घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र हार्दिकच्या एका अटीमुळे ही डील रद्द झाल्याचे समोर आले आहे.

Hardik Pandya IPL Trade
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएल २०२७ च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडबाबत अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. यात सर्वाधिक चर्चा आहे ती मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याची. हार्दिक पंड्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स किंवा दिल्ली कॅपिटल्स यांपैकी एखाद्या संघात तो जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. मात्र, आता एका नव्या अहवालानुसार, हार्दिकने एका चॅम्पियन संघाकडे जाण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्याच्या एका अटीमुळे ही डील फिसकटली आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून त्याची जुनी फ्रँचायझी ‘गुजरात टायटन्स’ आहे.

कर्णधारपदाच्या अटीमुळे फिस्कटले गणित

हार्दिक पंड्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्यानंतर तो गुजरात टायटन्समध्ये गेला आणि तिथे कर्णधार म्हणून त्याने पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिले. दुसऱ्या हंगामात संघ उपविजेता ठरला. मात्र, त्यानंतर त्याने पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला. मुंबईतील त्याची ही ‘घरवापसी’ फारशी यशस्वी ठरली नाही. फॉर्म खराब झाला आणि त्याच्यावर बरीच टीकाही झाली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, हार्दिकने गुजरात टायटन्समध्ये पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी संपर्क साधला होता.

Maharashtra TimesVanshi Bedi Om Namah Shivay Batting Video : 221 टार्गेट, शेवटच्या षटकात 16 धावा; माहीच्या टीममधील फलंदाजाचा पीचवरच ‘ओम नमः शिवाय’चा जप, पुढं चमत्कार घडला

जेव्हा हार्दिकने गुजरात टायटन्सशी चर्चा केली, तेव्हा फ्रँचायझीच्या सर्व सदस्यांनी त्याला संघात पुन्हा घेण्यास होकार दिला. शुभमन गिल आणि फ्रँचायझी यांच्यातही याबाबत चर्चा झाली होती आणि सर्वांची सहमती होती. सर्व काही सुरळीत सुरू होते, पण हार्दिकने एक मोठी अट ठेवली. त्याला केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर ‘कर्णधार’ म्हणून संघात परतायचे होते.

मुंबई इंडियन्ससारखी चूक करण्यास गुजरातचा नकार

हार्दिकची ही अट ऐकताच गुजरात टायटन्सने त्याला स्पष्ट नकार दिला. फ्रँचायझीने त्याला सांगितले की, “खेळाडू म्हणून तुझे नेहमीच स्वागत आहे, पण कर्णधार म्हणून नाही.” गुजरातकडे सध्या शुभमनगिलच्या रूपाने एक सक्षम कर्णधार आहे. दुसऱ्या एखाद्या खेळाडूला अचानक कर्णधार बनवून फॅन बेस कमी करण्याची किंवा मुंबई इंडियन्सने जी चूक केली, तीच चूक पुन्हा करण्याची गुजरात टायटन्सची कोणतीही इच्छा नव्हती. त्यामुळे ही जवळपास पक्की झालेली डील रद्द झाली.

Maharashtra Timesनादखुळा! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन तोडफोड फलंदाजांची चर्चा, 28 आणि 34 चेंडूत मिळून 159 धावा; पाहा नेमके कोण?

हार्दिकच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याच्या प्रवक्त्याने या सर्व घडामोडी फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, हार्दिकने अद्याप कोणत्याही फ्रँचायझीशी ट्रेडबाबत थेट चर्चा केलेली नाही आणि कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. जर कोणत्याही संघाला हार्दिकबाबत चर्चा करायची असेल, तर त्यांनी थेट मुंबईइंडियन्सच्या व्यवस्थापनाशी बोलणे आवश्यक आहे. आता हार्दिक पंड्या खरोखरच ट्रेड होणार की मुंबई इंडियन्समध्येच राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.