Headlines

स्वातंत्र्यदिनी भारताचा उद्या 600वा कसोटी सामना, कॅप्टन गिलकडून Playing11बाबत मोठी हिंट कोणाचा पत्ता कट होणार?


IND vs SL 1st Test : भारत आणि श्रीलंकेमधील पहिला सामना उद्या सकाळी सुरू होणार आहे. भारताचा ६००वा कसोटी सामना असणार असून तोही स्वातंत्र्यदिनी आल्याने आणखी महत्त्व वाढले आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत गिल काय ्म्हणाला जाणून घ्या.

IND vs SL Test
IND vs SL 1st Test(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत-श्रीलंकेदरम्यानच्या मालिकेतील पहिली कसोटी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे, असा इतिहास असताना श्रीलंकेने चार वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले. मात्र, भारतीय संघाने फिरकी गोलंदाजांवरच विश्वास दाखविण्याचे ठरवले आहे. अशातच सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शुभमन गिल याने बोलताना उद्याच्या सामन्यातील प्लेइंग ११ बाबत कोणते खेळाडू असतील आणि कोणत्या खेळाडूचा पत्ता कट झाले याबाबत हिंट दिली आहे.

देशासाठी ६०० वी कसोटी खेळणं हा प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाचा क्षण असतो. पण त्याच सामन्यात कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणं आणि तेही १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी करणं, हा माझ्यासाठी दुहेरी सन्मान आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण असल्याचं शुभमन गिल म्हणाला.

Maharashtra TimesRonaldo Georgina Rodriguez News: रोनाल्डो जॉर्जिना 10 वर्ष एकत्र, 5 मुलांनंतर लग्नाचा निर्णय; पण पहिल्या बाळापासूनच दोघांमधील कथित करार सोप्या शब्दात, महिन्याला 1 कोटीची डील
मी कर्णधाराची भूमिका आत्मविश्वासाने पार पाडत आहे. संघाचे टार्गेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे असून त्यासाठी ६ ते ७ टेस्ट जिंकणे गरजेचे आहे, त्यामुळे येथूनच चांगली सुरुवात करायची आहे. गुरनूर ब्रार जुना चेंडू आणि चांगल्या उसळीमुळे उपयुक्त आहे, तर प्रसिद्ध कृष्णानेही वार्म-अप मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, त्यामुळे अंतिम ११ ठरवणे कठीण आहे. बुमराह या दौऱ्यात नसल्याने इतर खेळाडूंसाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असल्याचं शुभमन गिल याने म्हटलं आहे. दुर्दैवाने साई सुदर्शनची दुखापत अपेक्षेप्रमाणे लवकर बरी झालेली नाही. कसोटी सामन्यात कोणताही धोका पत्करता येणार नसल्यामुळे त्याला संघात घेता येणार नाही. तरीही आम्हाला आमच्या १५ खेळाडूंच्या संघावर पूर्ण विश्वास असल्याचं शुभमन गिल म्हणाला.

Maharashtra TimesIND vs SL Test Playing 11 : श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीत बुमराहची जागा कोण भरून काढणार? गंंभीरकडे 2 पर्याय, पाहा कोण?
शुभमन गिलच्या या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसते की, उद्याच्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजसोबत प्रसिद्ध कृष्णा हा अंतिम ११ मध्ये खेळणार आहे. रविंद्र जडेजासोबत मानव सुतार हा दिसणार हे सुद्धा निश्चित आहे. कारण मानव हा फलंदाजी करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. अनुभव आणि आत्मविश्वास हा वेळेनुसार येत असतो. त्यासाठी मैदानावर खेळून धावा काढायला हव्यात, असंही गिलने म्हटलं आहे.

दरम्यान, कुलदीप यादव, मानव सुतार आणि रवींद्र जडेजा हे तिघे १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळणार असल्याचे मॉर्केल यांनी संकेत दिले होते. त्यानुसार प्लेइंग ११ दिसत आहे. गिल या गोलंदाजांचा ठरावीक वेळी कसा वापर करतो यावर सर्व अवलंबून आहे; पण कौशल्याचा विचार केला तर आमच्यासाठी २० बळी घेण्याची क्षमता या तिघांमध्ये नक्कीच असल्याचं मॉर्केल म्हणालेले.

Maharashtra TimesBAN vs AUS Test : पहिल्याच दिवशी तोफखाना घेत उतरलेली ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरूद्ध बॅकफूटवर पण भारताचं टेन्शन का वाढलं? जाणून घ्या
भारतीय संभाव्य प्लेइंग 11 : के.एल. राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (C), ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुतार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा