“सुनेत्रा पवार पालकमंत्री, तर मी बीडची पालक आहे”, पंकजा मुंडे यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे. गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ पंकजा मुंडेंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी हे विधान केलंय. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे.